RRB ग्रुप डीची मॉडिफिकेशन लिंक 'या' दिवशी होणार सक्रिय Rojgar News

RRB ग्रुप डीची मॉडिफिकेशन लिंक 'या' दिवशी होणार सक्रिय Rojgar News

Modification Link: रेल्वे भरती बोर्ड (, RRB) ने रेल्वे ग्रुप डी भर्ती २०१९ साठी नवीन अपडेट जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांचे अर्ज चुकीच्या फोटोमुळे किंवा चुकीच्या सहीमुळे नाकारले गेले त्यांना बोर्डाने (RRB) आणखी एक संधी दिली आहे. ज्या उमेदवारांना माहितीसाठी एकच नोटीस जाहीर करण्यात आली होती अशा उमेदवारांना दुरुस्त्या करण्यासाठी एक शेवटची संधी देण्यात येणार आहे. याआधी बोर्डाने मॉडिफिकेशन लिंक अॅक्टीव्ह करण्यास सांगितले होते. पण आता बोर्डाने लिंक अॅक्टिव्हेशनची तारीख जाहीर केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने त्यांची अधिकृत वेबसाइट rrbbhopal.gov.in वर जाहीर केलेल्या नोटीसद्वारे महत्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार उमेदवार १५ डिसेंबर २०२१ पासून त्यांच्या अर्जात दुरुस्ती करू शकतात. ज्या उमेदवारांचे अर्ज केवळ फोटो किंवा सहीमधील किरकोळ चुकांमुळे फेटाळण्यात आले, त्या उमेदवारांसाठी हा मोठा दिलासा आहे. अर्जाचा स्टेटस १५ डिसेंबर २०२१ रोजी आरआरबी ग्रुप डी मॉडिफिकेशन लिंक सक्रिय झाल्यानंतर संबंधित सर्व उमेदवार नोटिफिकेशनमध्ये दिल्यानुसार फोटो किंवा सहीमध्ये चूक सुधारू शकतात. अर्जाची स्टेटस तपासण्यासाठी उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख भरणे आवश्यक आहे. ज्यामुळे अर्ज स्वीकारला गेला आहे की रद्द झालाय याची अपडेट कळेल. ज्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत त्यांना या लिंकवर जाऊन सुधारणा करण्याची आवश्यकता नसेल. ज्या उमेदवारांचे अर्ज फोटो आणि/किंवा सहीमुळे नाकारले गेले, त्यांचा फोटो आणि सही यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी मॉडिफिकेशन लिंक अॅक्टीव्ह करण्यात येईल असे निर्देश याआधी आरआरबीतर्फे एका नोटीसच्या माध्यमातून देण्यात आले होते. प्रवेशपत्र कधी? रेल्वे ग्रुप डी भरती नोटिफिकेशन २०१९ नुसार या भरती अंतर्गत विविध युनिट्समध्ये एकूण १० हजार ३७६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांनी १२ मार्च ते १२ एप्रिल २०१९ या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरले. अर्जदार आता परीक्षा आणि प्रवेशपत्र जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. अर्ज दुरुस्ती प्रक्रियेनंतर परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. आरआरबी ग्रुप डी प्रवेशपत्र परीक्षेच्या चार दिवस आधी अपलोड केले जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3InEShD
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "RRB ग्रुप डीची मॉडिफिकेशन लिंक 'या' दिवशी होणार सक्रिय Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel