Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १० जानेवारी, २०२२, जानेवारी १०, २०२२ WIB
Last Updated 2022-01-10T13:00:35Z
Rojgar

नीट पीजी काऊन्सेलिंग १२ जानेवारीपासून सुरु, 'येथे' करा नोंदणी

Advertisement
PG Counseling: () प्रक्रिया १२ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने निवासी डॉक्टरांना दिलेल्या आश्वासनानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १२ जानेवारी २०२२ पासून एमसीसीद्वारे नीट पीजी समुपदेशन सुरू केले जात आहे. यामुळे करोनाविरुद्धच्या लढाईत देशाला अधिक बळ मिळेल असे डॉ. मनसुख मांडविय यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानंतर महत्त्वाची नोटीस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) नीट प्रवेशांमधील आरक्षणावर एक महत्त्वपूर्ण नोटीस जाहीर केली होती. एमसीसीने उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली. तसेच काऊन्सेलिंगचे नवीन वेळापत्रक अधिकृत वेबसाइट mcc.nic.in लवकरच प्रसिद्ध केले जाईल असे आश्वासन दिले. एमसीसी ऑल इंडिया कोटा जागांमध्ये नीट यूजी प्रवेश परीक्षा २०२१ (NEET UG Entrance Exam 2021) साठी १५ टक्के आणि नीट पीजी प्रवेश २०२१ साठी ५० टक्के जागांवर ऑनलाइन काऊन्सेलिंग होणार आहे. यूजी आणि पीजी या दोन्ही स्तरांसाठी उर्वरित जागांसाठी राज्यनिहाय काऊन्सेलिंग आधीच सुरू झाले आहे. अशी करा नोंदी नीट पीजी २०२१ च्या काऊन्सेलिंग अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर जा आणि नोंदणी लिंकवर क्लिक करा. नाव, जन्मतारीख, रोल नंबर, नीट पीजी २०२१ नोंदणीकृत कोड, सिक्योरीटी कोड यासारखे तपशील सबमिट करा. नीट पीजी काऊन्सेलिंग लॉगिन क्रेडेन्शियल भरुन लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर पालकांची डिटेल्स, कॉंटेक्ट डिटेल्स, ग्रेड आणि नॅशनालिटी भरा. नीट पीजी २०२१ अर्ज क्रमांक आणि रोल भरा. श्रेणीनिहाय नोंदणी शुल्क भरा. फी भरल्यानंतर त्याची नोंदणी स्लिप तयार होईल. नोंदणी स्लिप डाउनलोड करा आणि स्लिपची प्रिंटआउट घ्या. नीट पीजी २०२१ च्या काऊन्सेलिंगलाठी १२ ते १७ जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. १८ जानेवारीपर्यंत फॉर्मचे व्हेरिफिकेशन करता येणार आहे. २० ते २१ जानेवारी दरम्यान सीट अलॉटमेंट होणार आहे. २२ जानेवारी रोजी निकाल लागणार असून २३ ते २८ जानेवारीदरम्यान रिपोर्टींग करावे लागणार आहे. नीट पीजी २०२१ च्या काऊन्सेलिंगच्या राऊंड २ साठी ३ ते ७ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत फॉर्मचे व्हेरिफिकेशन करता येणार आहे. १० ते ११ दरम्यान सीट अलॉटमेंट होणार आहे. राऊंड २ चा निकाल १२ फेब्रुवारी २०२२ रोजी लागणार असून उमेदवारांना १३ ते १९ फेब्रुवारीदरम्यान रिपोर्टींग करावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नीट पीजी २०२१ मध्ये ओबीसी आरक्षण आणि इडब्ल्यूएस कोट्यावर निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसाठी २७ टक्के आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १० टक्के आरक्षणाची वैधता कायम ठेवली. याचिकेत इतर मागासवर्गासाठी २७ टक्के आरक्षण आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय कोट्यातील जागांवर ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. NEET प्रवेश परीक्षेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना MBBS मध्ये १५ टक्के जागा आणि MS, MD अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ५० टक्के जागा अखिल भारतीय कोट्यातून भरल्या जातात.


source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-pg-counseling-process-begins-from-january-12-click-here-to-know-latest-updates/articleshow/88811266.cms