TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

नोकरीची संधी

सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

करन्सी नोट प्रेस, नाशिक रोड, (सिक्युरिटी पिंट्रिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (SPMCIL) चे एक युनिट) पुढील १५१ पदांची भरती. (Advt.No.CNPN/HR/Rect. / ०१ / २०२१) (१) ज्युनियर टेक्निशियन (पिंट्रींग / कंट्रोल) – १०४ पदे (अजा – १५, अज – ७, इमाव – २८, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ४४) (१ पद दिव्यांग ओएल / एचएचसाठी राखीव).

पात्रता – पिंट्रिंग ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट कोर्स (जसे की, लेटर प्रेस मशिन माईंडर, लिथो ऑफसेट मशिन माइंडर, ऑफसेट पिंट्रिंग, प्लेट मेकींग, इलेक्ट्रोप्लेटिंग / (प्लेट मेकर कम इम्पोझिटर ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट आणि  NCVT चे १ वर्षांचे  NAC सर्टिफिकेट).

(२) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप)

(i) (इलेक्ट्रिकल) – ७ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ५). (ii) एअर कंडिशिनग – २ पदे (खुला). (iii) मेकॅनिकल – ८ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – ५). (iv) इलेक्ट्रॉनिक्स – ४ पदे (इमाव – १, खुला – ३).

पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय आणि  NCVT कडील १ वर्षांचे नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट.

(३) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (लेव्हल बी-३) – ६ पदे (इमाव – ३, खुला – ३).

पात्रता – (दि. २५ जून २०२२ रोजी) पदवी (कोणत्याही शाखेतील) किमान ५५ % गुणांसह उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान व गरजेनुसार टायिपग स्पीड ४० श.प्र.मि. (इंग्रजी) / ३० श.प्र.मि. (हिंदूी).

(६) सुपरवायझर (टेक्निकल – कंट्रोल / लेव्हल एस-१) – १० पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).

(७) सुपरवायझर (टेक्निकल – ऑपरेशन – पिंट्रिंग) लेव्हल-एस-१ – ५ पदे (अजा – ३, इमाव – २) (बॅकलॉगमधील पदे).

पद क्र. ६ व ७ साठी पात्रता – पिंट्रिंग टेक्नॉलॉजीमधील प्रथम वर्गातील इंजिनीअिरग डिप्लोमा (संबंधित विषयातील इंजिनीअिरग पदवीधारक अर्ज करण्यास पात्र आहेत.)

(८) वेल्फेअर ऑफिसर (लेव्हल ए-२) – १ पद (खुला).

पात्रता – सोशल सायन्स विषयातील पदवी किंवा पदविका / एमएसडब्ल्यू (पर्सोनेल मॅनेजमेंट / आयआर / लेबर लॉ अँड लेबर वेल्फेअर इ. विषयातील पदव्युत्तर पदवी)

(४) सेक्रेटरियल असिस्टंट (लेव्हल बी-४) – १ पद (खुला).

पात्रता – पदवी किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण आणि स्टेनोग्राफी ८० श.प्र.मि. इंग्लिश किंवा हिंदूी आणि इंग्लिश टायिपग ४० श.प्र.मि. किंवा हिंदूी टायिपग ३० श.प्र.मि.

(५) सुपरवायझर (ऑफिशियल लँग्वेज) (लेव्हल ए-१) – १ पद (खुला).

पात्रता – हिंदूी किंवा इंग्रजी विषयासह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. (पदवी इंग्रजी किंवा हिंदूी विषयांसह उत्तीर्ण) आणि १ वर्षांचा ट्रान्सलेशनमधील अनुभव.

वयोमर्यादा – दि. २५ जानेवारी २०२२ रोजी, पद क्र. १ व २ साठी १८ ते २५ वर्षेपर्यंत. ३ व ४ साठी १८ ते २८ वर्षेपर्यंत. पद क्र. ५ ते ८ साठी १८ ते ३० वर्षेपर्यंत. (उच्चतम वयोमर्यादेत सूट इमावसाठी – ३ वर्षे, अजा / अज – ५ वर्षे, अपंग – १० / १३ / १५ वर्षे)

परीक्षा शुल्क – रु. ६०० / – (रु. २०० / – अजा / अज / दिव्यांग उमेदवारांसाठी).

निवडलेल्या उमेदवारांना १ वर्षांचा प्रोबेशन कालावधी असेल, जो १ वर्षांने वाढविला जाऊ शकतो.

वेतन –  IDA पॅटर्न वेतनश्रेणी – पद क्र. १ व २ साठी रु. १८,७८० / – – ६७,३९० / -; पद क्र. ३ साठी रु. २१,५४० / – – ७५,१६० / -; पद क्र. ४ साठी रु. २३,९१० / – – ८५,५८० / -; पद क्र. ५ ते ७ साठी रु. २७,६०० / – – ९५,९१० / -; पद क्र. ८ साठी रु. २९,७४० / – – १,०३,००० / -.

निवड पद्धती – ऑब्जेक्टिव्ह ऑनलाइन टेस्ट पद क्र. ५ ते ८ साठी (१) प्रोफेशनल नॉलेज, (२) जनरल अवेअरनेस, (३) इंग्लिश भाषा, (४) लॉजिकल रिझिनग, (५) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड. प्रत्येकी ४० प्रश्न. प्रश्नांना प्रत्येकी १ गुण असेल. एकूण प्रश्न – २००, एकूण गुण – २४०, वेळ – १२० मिनिटे. (जनरल अवेअरनेससाठी २० मिनिटे, इतर विषयांसाठी प्रत्येकी २५ मिनिटे)

पद क्र. १ व २ साठी ऑब्जेक्टिव्ह ऑनलाइन टेस्ट एकूण प्रश्न १२०, एकूण गुण १२०, वेळ १२० मिनिटे (प्रत्येक विषयासाठी) ३० मिनिटे (जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस, लॉजिकल रिझिनग, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड).

पद क्र. ३ व ४ पदांसाठी ऑनलाइन टेस्ट प्रोफेशनल नॉलेज विषय वगळता इतर ४ विषयांवरील प्रत्येकी ४० प्रश्न, एकूण १६० प्रश्न, १६० गुण, वेळ २ तास. (प्रत्येक विषयासाठी ३० मिनिटे) ऑनलाइन परीक्षा / टायिपग स्कील टेस्ट फेब्रुवारी / मार्च २०२२ दरम्यान होईल. कोणत्याही प्रकारचे नकारात्मक गुण दिले जाणार नाहीत. याशिवाय पद क्र. ३ साठी टायिपग टेस्ट व पद क्र. ४ साठी स्टेनोग्राफी / टायिपग टेस्ट घेतली जाईल. (या दोनही टेस्ट फक्त पात्रता स्वरूपाच्या असतील.) अंतिम निवड ऑनलाइन टेस्टमधील गुणानुक्रमे केली जाईल.

परीक्षा केंद्र – नाशिक, मुंबई, भोपाळ, हैद्राबाद, दिल्ली व कोलकता.

ऑनलाइन अर्ज  https://cnpnashik.spmcil.com या संकेतस्थळावर दि. २५ जानेवारी २०२२ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. (अर्जाचे रजिस्ट्रेशन – फी भरणे – कागदपत्र स्कॅन करून अपलोड करणे.)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)

(Advt.  No. ००१ / २०२२) महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत आस्थापनांवरील ‘सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ’ पदांची भरती.

एकूण रिक्त पदे – ५४७. (अजा – ६०, अज – २५, विजा-अ – १८, भज-ब – १७, भज-क – २७, भज-ड – १२, विमाप्र – १६, आदुघ – ५५, इमाव – १०५, खुला – २१२) (२२ पदे दिव्यांगांसाठी राखीव –  B/LV – ५,  D/HH – ५,  LD /CP – ६,  SLD /ID – ६) (३०% जागा महिलांसाठी ५% जागा खेळाडूंसाठी राखीव) (५ जागा अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव).

महिला आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) तसेच नॉन-क्रिमीलेअरमध्ये मोडत असल्याबाबत (अजा / अजचे उमेदवार वगळून) पुरावा सादर करावा लागेल.

पात्रता – (दि. २७ जानेवारी २०२२ रोजी) कायदा विषयातील पदवी उत्तीर्ण आणि कोर्टात ५ वर्षांचा अ‍ॅडव्होकेट म्हणून काम करण्याचा अनुभव किंवा सरकारी नोकरीत असलेले पोलीस प्रोसिक्युटर यांना अनुभवाची अट लागू नाही. (अजा / अजमधून बुद्धिझम धर्मातरित उमेदवार तसेच अज / विमुक्त जाती / भटक्या जमातीचे पुरेसे उमेदवार न मिळाल्यास अनुभवाची अट शिथिल केली जाऊ शकते.)

वयोमर्यादा – (दि. १ मे २०२२ रोजी) अराखीव (खुला) – ३८ वर्षे, मागासवर्गीय / आदुघ / अनाथ / खेळाडू – ४३ वर्षे, दिव्यांग – ४५ वर्षे.

दि. १ मार्च २०२० ते दि. १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

निवड प्रक्रिया – जाहिरातीत नमूद शैक्षणिक अर्हता आणि / अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.

परीक्षा शुल्क – खुला – रु. ७१९ / -; मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ रु. ४४९ / -. ऑनलाईन परीक्षा शुल्क दि. २७ जानेवारी २०२२ रोजी (२३.५९ वाजे)पर्यंत भरता येईल.

भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे असल्यास दि. २९ जानेवारी २०२२ (२३.५९ वाजे)पर्यंत चलनाची प्रत घेणे आवश्यक व चलान भारतीय स्टेट बँकेत दि. ३१ जानेवारी २०२२ (बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत) भरता येईल.

ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करावयाची प्रमाणपत्रे / कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ प्रकरण क्र. ४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज  https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर दि. २७ जानेवारी २०२२ पर्यंत करावेत.

The post नोकरीची संधी appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: नोकरीची संधीhttps://ift.tt/3dmx3ZV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या