TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CMA फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर, थेट लिंकवरून 'येथे' तपासा

result: इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट्स ऑफ इंडिया (Institute of Cost Accountants of India, ICMAI) ने डिसेंबरमध्ये घेतलेल्या सीएमए फाउंडेशन परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार आयसीएमएआयच्या अधिकृत वेबसाइट icmai.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. सीएमए परीक्षेत पास होण्यासाठी विशिष्ट गुण मिळवणे अनिवार्य आहे. कट ऑफ स्कोअर पूर्ण करु न शकलेले विद्यार्थी या परीक्षांमध्ये पात्र मानले जाणार नाहीत. इंटरमिजिएट सारख्या इतर परीक्षांसाठी सीएमए रिझल्ट २०२१-२२(ICMAI CMA Result) चा निकाल नंतर प्रसिद्ध केला जाणार आहे. सध्या केवळ फाउंडेशन परीक्षेचे निकाल उपलब्ध आहेत. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे ओळखपत्र आणि जन्मतारीख भरावी लागेल. उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल तपासता येणार आहे. असा तपासा निकाल उमेदवारांनी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट icmai.in वर क्लिक करा. होमपेजवर 'निकाल' लिहिलेल्या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर, 'ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा' या लिंकवर क्लिक करा. आता तुमचा रोल नंबर आयडेंटी नंबर भरा. यानंतर तुमचा ICMAI CMA Result 2021-22 तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित दिसेल. भविष्यातील संदर्भांसाठी एक प्रिंट डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या. फाऊंडेशन सीए परीक्षा १३ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आली. परीक्षेचा पेपर १ आणि पेपर २ दुपारी २ ते ५ दरम्यान तीन तासांच्या कालावधीसाठी घेण्यात आला. परीक्षेला बसलेले अनेक उमेदवार निकाल जाहीर होण्याची वाट पाहत होते. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात.


source https://maharashtratimes.com/career/career-news/cma-foundation-exam-result-declared-results-of-cma-foundation-exam-held-in-december-check-this-way-from-direct-link/articleshow/88966528.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या