TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

RBI SO Recruitment 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती, जाणून घ्या तपशील

RBI SO jobs 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी आणली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया १५ जानेवारीपासून सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण १४ पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

रिक्त पदांचा तपशील

कायदा अधिकारी ग्रेड बी (Law Officer Grade B) – २ पदे

व्यवस्थापक (तांत्रिक-सिव्हिल) (Manager (Technical-Civil) – ६ पदे

व्यवस्थापक (तांत्रिक-इलेक्ट्रिकल) (Manager (Technical-Electrical)– ३ पदे

लायब्ररी प्रोफेशनल (सहाय्यक ग्रंथपाल) ग्रेड A – १ पद

आर्किटेक्ट ग्रेड A (Architect Grade A)– १ पद

पूर्णवेळ क्युरेटर (full-time curator) – १ पद

(हे ही वाचा: Railway Recruitment 2022: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे गट सी पदांसाठी भरती; जाणून घ्या संपूर्ण तपशील)

पात्रता काय?

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचणे आवश्यक आहे. लायब्ररीयन प्रोफेशनल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला, वाणिज्य, विज्ञान या विषयात पदवी किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. आर्किटेक्ट ग्रेड A च्या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान ६०% गुणांसह आर्किटेक्चरमध्ये पदवीधर असावेत.

The post RBI SO Recruitment 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती, जाणून घ्या तपशील appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: RBI SO Recruitment 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती, जाणून घ्या तपशीलhttps://ift.tt/3dmx3ZV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या