
University : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाच्या १२ जागांची भरती केली जाणार आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, इकोनॉमिक्स, सोशयोलॉजी, बीबीए, कॉम्प्युटर सायन्स विषयांसाठी प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या जागा रिक्त आहेत. बीए इकोनॉमिक्स विषयासाठी ३ जागा, बीए सोशओलॉजीसाठी २ जागा, बीबीएसाठी ३ जागा तर इतर सर्व विषयांसाठी प्रत्येकी एक जागा भरण्यात येणार आहे. २०२१-२२ या शैक्षणिक कालावधीपुरता पदाचा कालावधी असणार आहे. उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर डिग्रीमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक गुण मिळणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. इमेदवारांनी आपला अर्ज प्राचार्य, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली-औंढा रोड, दिग्रस फाटा, संतुक पिंपरी, हिंगोली-४३१७०५ या पत्त्यावर पाठवायचा आहे. ४ फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
source https://maharashtratimes.com/career/career-news/recruitment-various-post-vacant-in-swami-ramanand-tirth-marathwada-university-know-details/articleshow/88896255.cms
0 टिप्पण्या