
Recruitment: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागात विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यात येणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या पदभरती अंतर्गत प्रोग्रामर (Programmer), डेव्हलपर, सिस्टम (Developer, System) सॉफ्टवेअर प्रोग्रामर (Software Programmer) पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पर दिवशी १००० रुपयांप्रमाणे पगार दिला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत होणारी निवड ३ वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. मुदतीपुर्वी प्रकल्प बंद करण्याचे अधिकार विद्यापीठाकडे असतील. तसेच उमेदवाराचे कामकाज असमाधानकारक असल्यास सेवा तात्काळ बंद करण्यात येईल. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. संबंधित अधिविभाग, , कोल्हापूर या पत्त्यावर दिलेल्या वेळेत मुलाखत होणार आहे. अनुभवी आणि पात्र उमेदवारांनी आपली कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी १०.३० वाजण्यापुर्वी संचालकांकडे सादर करणे गरजेचे आहे. २७ जानेवारी रोजी प्रोग्रामर/डेव्हलपर पदासाठी थेट मुलाखती आणि प्रात्यक्षिक परीक्षा होतील. निवड झालेल्या उमेदवारांना गोपनीयतेबाबत बंधपत्र द्यावे लागेल. मुलाखतीला येण्यापुर्वी उमेदवारांनी पदभरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
source https://maharashtratimes.com/career/career-news/shivaji-university-recruitment-various-posts-vacant-in-shivaji-university-selection-will-be-through-direct-interview/articleshow/89033155.cms
0 टिप्पण्या