Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२, जानेवारी ०७, २०२२ WIB
Last Updated 2022-01-07T07:00:27Z
Rojgar

माझगाव डॉकमध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील

Advertisement
Recruitment: शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये (Mazgaon dock ) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदभरती अंतर्गत विविध पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentices) पदभरतीच्या ७९ जागा भरण्यात येत आहेत. त्या अंतर्गत केमिकल इंजिनीअर (Chemical Engineer)ची १, कॉम्प्युटर इंजिनीअरच्या (Computer Engineer) २, सिव्हिल इंजिनीअर (Civil Engineer)च्या ३, इलेक्ट्रीकल इंजिनीअर (Electrical Engineer) च्या १५, इलेक्ट्रीकल अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर (Electrical and Chemical Engineer) च्या ५, मॅकेनिकल इंजिनीअर (mechanical engineering)च्या ४३, प्रोडक्शन इंजिनीअर (Production Engineer)च्या ५ आणि शिपबिल्डींग टेक्नोलॉजी (Shipbuilder Technology)च्या ५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा संस्थेतून इंजिनीअरिंग किंवा टेक्नोलॉजीमध्ये डिग्री पूर्ण असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ९ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentices)पदाच्या एकूण ७ जागा भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत इलेक्ट्रीकल इंजिनीअर (Electrical Engineer)च्या २ आणि मॅकेनिकल इंजिनीअर (mechanical engineering)च्या ५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा संस्थेतून इंजिनीअरिंग किंवा टेक्नोलॉजीमध्ये डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड उमेदवाराला ८ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. या पदाचा कालावधी १ वर्षाचा असणार आहे. उमेदवारांना मुंबई कार्यालयात काम करता येणार आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरतीमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.mazagondock.in वरील करिअर सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. २५ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/mazgaon-dock-recruitment-various-post-vacant-in-mazgaon-dock-shipbuilders-recruitment/articleshow/88749135.cms