Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ६ जानेवारी, २०२२, जानेवारी ०६, २०२२ WIB
Last Updated 2022-01-06T13:00:52Z
Rojgar

रत्नागिरी जिल्हयातील शाळा आजपासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांकडून नव्याने मार्गदर्शक सूचना जारी

Advertisement
रत्नागिरी: राज्यात करोनाचा वाढता आलेख तसेच जिल्ह्यामध्ये कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने प्राथमिक शाळा, माध्यमिक हायस्कूल ६ जानेवारीपासून बंद करण्यात आल्या आहेत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेळोवेळी शासन स्तरावरुन तसेच या कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तथापि, कोविड-१९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व रुग्णसंख्येमुळे विदयार्थ्यांमध्ये कोविड-१९ विषाणूच्या संक्रमणाचा धोका विचारात घेता, इयता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे सर्व वर्ग पुढील आदेशांपर्यंत बंद करण्यात आले आहेत. डॉ.बी.एन.पाटील, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी, साथरोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करुन कोविड -१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांबाबत खालील प्रमाणे आदेश जारी केले आहेत - - रत्नागिरी जिल्ह्यातील इ.१ ली ते ९ वी आणि इ.११ वी चे वर्गामधील प्रत्यक्ष अध्ययन - अध्यापन ६ जानेवारी २०२२ पासून पुढील आदेशांपर्यंत बंद राहील. - या कालावधीत शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहील. - दहावी, बारावीची बोर्डाची परीक्षा जाहीर झाली आहे. विदयार्थ्यांची जानेवारी व फेब्रुवारी २०२२ मध्ये अंतर्गत मूल्यमापन व प्रात्यक्षिक परीक्षा आहे. त्यामुळे कोविड-१९ विषयक नियमांचे पालन करुन सर्व इ.१० वी व १२ वी च्या वर्गांमध्ये प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन पूर्ववत सुरु राहील. - वय वर्षे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण आवश्यक राहील. यासाठी शाळा / महाविदयालयांमध्येआवश्यकतेनुसार कॅम्प लावणे आवश्यक राहील. यापुर्वी कोविड-१९ च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले कडक निर्बध कायम राहतील. सर्व शाळा, महाविदयालये यांची वसतिगृहे सुध्दा पूर्णपणे बंद राहतील. शाळा व महाविदयालयांमधील शिक्षक तथा कर्मचारी यांनी शाळा महाविदयालयाच्या कामासाठी शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य राहील.


source https://maharashtratimes.com/career/career-news/schools-in-ratnagiri-district-shut-from-january-6th-till-further-notice-due-to-increase-in-corona-cases/articleshow/88732596.cms