'नीट-पीजी'वर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

'नीट-पीजी'वर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा-पदव्युत्तर (NEET PG) प्रवेशासंबंधी आर्थिक दुर्बल वर्गास (EWS) आरक्षण देण्याबाबतच्या याचिकेवर आज, बुधवारी तातडीची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सहमती दर्शवली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची विनंती केंद्र सरकारने केली होती. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्या. सूर्य कांत आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने केंद्रातर्फे महान्याय अभिकर्ता (सॉलिसिटर जनरल) तुषार मेहता यांनी सादर केलेल्या विनंतीचा विचार करून ही सहमती दर्शवली आहे. 'हे प्रकरण मेडिकलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संबंधित आहे आणि त्यांना प्रवेशसंबंधी अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे, या मुद्द्यांचा विचार करून हे प्रकरण तातडीने सुनावणीला घ्यावे,' असे या विनंतीत म्हटले आहे. नीट-पीजी २०२१ समुपदेश प्रक्रियेच्या विलंबामुळे दिल्लीसह देशभरातील अनेक भागांत वेगवेगळ्या रुग्णालयांत आणि निवासी डॉक्टरांच्या महासंघातर्फे (फोर्डा) आंदोलन सुरू आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-pg-admissions-sc-to-hear-plea-on-ews-quotatoday/articleshow/88703293.cms

0 Response to "'नीट-पीजी'वर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel