
CBSE Term 2 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने(Central Board of Secondary Education, CBSE)दहावी, बारावी टर्म २ बोर्ड परीक्षा २०२२ मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत. सध्या सीबीएसईचे विद्यार्थी टर्म १ निकाल २०२२ ची वाट पाहत आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा वाढचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द किंवा ऑनलाइन करा असे आवाहन काही विद्यार्थी सोशल मीडियामध्ये करत आहे. विद्यार्थी सध्या सीबीएसई बोर्ड टर्म २ परीक्षांच्या तयारीत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई दहावी, बारावीच्या प्रॅक्टीकल परीक्षा फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. टर्म २ वेळापत्रक २०२२ देखील पुढील आठवड्यापर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टर्म २ बोर्ड परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक देखील तयार करण्यात आले आहे. सीबीएसई टर्म १ निकाल २०२२ सह टर्म २ वेळापत्रक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. याअंतर्गत प्रॅक्टीकल परीक्षेसोबत थ्योअरी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. सीबीएसईच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड १५ फेब्रुवारीपासून प्रॅक्टीकल परीक्षा सुरू करू इच्छित आहे. मात्र, सध्या करोनाची परिस्थिती आणि ५ राज्यांतील निवडणुकांमुळे हे शक्य नाही. अशा परिस्थितीत आता फेब्रुवारीच्या अखेरीस प्रॅक्टीकल परीक्षा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. टर्म २ ची थ्योअरी परीक्षा २० मार्च २०२२ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बोर्ड प्रथम मुख्य परीक्षा आणि नंतर लहान विषयांच्या परीक्षा घेणार आहे. परीक्षा झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर केला जाईल, असे सीबीएसई बोर्डाकडून परीक्षेपूर्वी सांगण्यात आले होते. सीबीएसईने टर्म १ च्या निकालाची तारीख जाहीर केली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डातर्फे १५ जानेवारी २०२२ पर्यंत इयत्ता दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षांचे निकाल जाहीर करू शकतात. सीबीएसईतर्फे टर्म १ बोर्ड परीक्षांच्या मध्यावर मूल्यांकन धोरणातील बदल जाहीर करण्यात आला होता. १६ डिसेंबर २०२१ रोजी परीक्षेच्या तारखेलाच मूल्यांकन केले जाणार नाही, असे बोर्डाकडून शाळांना सांगण्यात आले. सीबीएसईच्या या निर्णयामुळे, किमान ७ विषयांचे (मेजर आणि मायनर) मूल्यमापन लांबले आणि त्यांचे मूल्यांकन शाळांनी बाह्य तपासणीसाठी बोर्डाकडे पाठवले. मूल्यमापन प्रक्रियेला जास्तीत जास्त ५ ते ७ दिवस लागतील, असे मानले जात होते. त्यामुळे सीबीएसई टर्म १ निकाल २०२१-२२ जाहीर होण्यास विलंब अपेक्षित होता.
source https://maharashtratimes.com/career/career-news/cbse-term-2-date-sheet-2022-cbse-term-2-examinations-start-and-when-will-the-first-term-results/articleshow/89149724.cms
0 टिप्पण्या