Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ६ जानेवारी, २०२२, जानेवारी ०६, २०२२ WIB
Last Updated 2022-01-06T14:01:01Z
Rojgar

CSIR UGC NET परीक्षेसाठी करेक्शन विंडो खुली

Advertisement
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने,(NTA) ५ जानेवारी २०२२ रोजी CSIR जून 2021 साठी करेक्शन विंडो उघडली आहे. ज्या उमेदवारांना अर्जामध्ये बदल करायचे आहेत ते NTA CSIR NET च्या अधिकृत साईट csir.nta.nic.in द्वारे करू शकतात. बदल करण्याची अंतिम तारीख ९ जानेवारी २०२२ आहे. UGC NET परीक्षेसाठी सर्व नोंदणीकृत उमेदवारांना सूचित करण्यात आले आहे की त्यांनी वेबसाइटला भेट देऊन त्यांचे तपशील पाहावेत. उमेदवार त्यांच्या संबंधित नोंदणी फॉर्ममध्ये त्यांच्या तपशीलांमध्ये काही दुरुस्त्या असतील तर त्या आता करू शकतात परंतु दुरुस्ती विंडोच्या शेवटच्या तारखेनंतर, कोणत्याही परिस्थितीत NTA द्वारे तपशीलातील कोणत्याही सुधारणांचा विचार केला जाणार नाही. क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/यूपीआय किंवा पेटीएम वॉलेटद्वारे ऑनलाइन दुरुस्ती करताना संबंधित उमेदवाराकडून अतिरिक्त शुल्क भरले जाईल. ज्यांनी ८ जानेवारी २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी आवश्यक शुल्कासह अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला आहे, अशा उमेदवारांसाठी सुधारणा सुविधा फक्त उपलब्ध आहे. CSIR UGC NET परीक्षा २९ जानेवारी, १५ ते १८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घेतली जाणार आहे. परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल.


source https://maharashtratimes.com/career/career-news/csir-ugc-net-correction-window-active-apply-till-9th-january/articleshow/88734546.cms