Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२, जानेवारी ०७, २०२२ WIB
Last Updated 2022-01-07T05:48:12Z
करिअर वृत्तान्त – LoksattacareerResults

GATE Admit Card 2022: आजही मिळणार नाही गेट २०२२ प्रवेशपत्र; वेबसाईटवर जाहीर केली नोटीस

Advertisement

इंजिनिअरिंगच्या पीजी कोर्सच्या ऍडमिशनसाठी घेण्यात येणाऱ्या गेट २०२२ परीक्षेचे (GATE 2022 Exam) प्रवेशपत्र आज ७ जानेवारीला जाहीर करण्यात येणार होते. परंतु IIT च्या वेबसाइटवर यासंबंधी नोटीस जाहीर करण्यात आली असून प्रवेशपत्र देण्याची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं यात म्हटलंय. म्हणजे आजही गेट २०२२चे प्रवेशपत्र परीक्षार्थ्यांना मिळणार नाही आहे. दरम्यान, या परीक्षेचे प्रवेशपत्र आधी ३ जानेवारीला जाहीर करण्यात येणार होते. तेव्हा तारीख पुढे ढकलून, ७ जानेवारीला प्रवेशपत्र जाहीर केले जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु आजही हे प्रवेशपत्र जाहीर करण्यात येणार नाही आहे. सलग दुसऱ्यांदा प्रवेशपत्र मिळण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर gate.iitkgp.ac.in या संकेतस्थळावर जाऊन परीक्षार्थी हे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव, गेट २०२२ परीक्षेची तारीख आणि वेळ, पत्ता इत्यादी तपशील नमूद केलेले असतील.

असं असेल परीक्षेचं वेळापत्रक

४ फेब्रुवारी २०२२ : मिसलेनियस एक्टिविटीज् (दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत)

५ फेब्रुवारी २०२२ : सीएस आणि बीएम (सकाळी ९ ते दुपारी १२) आणि ईई आणि एमए (दुपारी २.३० ते संध्याकाळी ५.३०)

६ फेब्रुवारी २०२२ : इसी, इएस, एसटी, एनएम, एमटी, एमएन (सकाळी ९ ते दुपारी १२) आणि सीवाय, सीएच, पीआई, एक्सएच, आईएन, एजी, सीजी आणि टीएफ (दुपारी २.३० ते संध्याकाळी ५.३०)

११ फेब्रुवारी २०२२ : मिसलेनियस एक्टिविटीज् (दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत)

१२ फेब्रुवारी २०२२ : सीई-1, बीटी, पीएच इवाय (सकाळी ९ ते दुपारी १२) आणि सीई-2, एक्सई एक्सएल (दुपारी २.३० ते संध्याकाळी ५.३०)

१३ फेब्रुवारी २०२२ : एमइ-1, पीई, एआर (सकाळी ९ ते दुपारी १२) आणि एमई-2, जीई, एई (दुपारी २.३० ते संध्याकाळी ५.३०)

GATE Admit Card 2022: ‘या’ तारखेला मिळणार प्रवेशपत्र; ‘असं’ करता येईल डाउनलोड

प्रवेशपत्रावर कोणत्या बाबी नमूद असतील

उमेदवाराचे नाव (Candidate’s Name)

नोंदणी क्रमांक (Registration number)

गेट २०२२ पेपर कोड (GATE 2022 paper code)

परीक्षा केंद्र कोड (Examination center code)

परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता (Name and address of the exam center)

परीक्षेची तारीख आणि दिवस (Date and day of the exam)

परीक्षेच्या वेळा (Examination Timings)

उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी (Candidate’s Photograph and Signature)

गेट आयोजक अध्यक्षांची स्वाक्षरी (Signature of GATE organizing chairman)

परीक्षा दिवस सूचना (Examination Day Instructions)

गेट २०२२ प्रवेशपत्रासोबत काय घेऊन जावे ?

उमेदवारांनी गेट २०२२ च्या प्रवेशपत्रासोबत वैध ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. स्वीकारार्ह फोटो आयडींची यादी खाली नमूद केली आहे:

१. पासपोर्ट (Passport)
२. मतदार ओळखपत्र (Voter ID)
३. आधार कार्ड (Aadhaar Number)
४. पॅन कार्ड (PAN Card)
५. वैध महाविद्यालय ओळखपत्र (Valid College ID)
६. कर्मचारी ओळखपत्र (Employee Identification Card)
७. चालक परवाना (Driving License)

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी फोटो आयडीची यादी

१. पासपोर्ट (Passport)
२. सरकारने जारी केलेलं ओळखपत्र (Government Issued ID)
३. कर्मचारी ओळखपत्र (Employee ID)

एनरोलमेंट आयडी किंवा पासवर्ड विसरल्यास काय करावे?

उमेदवार त्यांचा नावनोंदणी आयडी आणि पासवर्ड विसरल्यास, उमेदवारांनी खालील पायऱ्यांचा वापर करावा.

गेट प्रवेशपत्र २०२२ – नावनोंदणी आयडी पुनर्प्राप्त करण्यासाठी पायऱ्या :

‘नावनोंदणी आयडी विसरलो’ (Forgot Enrollment ID) वर क्लिक करा

नोंदणीकृत केलेला मोबाईल क्रमांक सबमिट करा.

नावनोंदणी आयडी उमेदवाराच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीवर पाठविला जाईल.

गेट प्रवेशपत्र २०२२ – पासवर्ड पुनर्प्राप्त करण्यासाठी पायऱ्या :

‘ओटीपीसाठी विनंती’ (Request for OTP) वर क्लिक करा

उमेदवारांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल.

ओटीपी सबमिट केल्यानंतर उमेदवार त्यांचा पासवर्ड बदलू शकतील.

गेट २०२२ प्रवेशपत्र – ‘हे’ महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा

गेट प्रवेशपत्र २०२२ हे परीक्षेला बसण्यासाठी अनिवार्य दस्तऐवज आहे.

गेट परीक्षा २०२२ च्या प्रवेशपत्रासोबत उमेदवारांकडे वैध फोटो ओळखपात्र असणे आवश्यक असून ते केंद्रावर पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.

गेट २०२२ च्या प्रवेशपत्रावर उमेदवारांनी त्यांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी सुवाच्य असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

गेट २०२२ परीक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे :

गेट २०२२ परीक्षा सुरु होण्याच्या किमान ६० मिनिटे आधी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर हजर राहावे. शेवटच्या क्षणाचा गोंधळ टाळण्यासाठी आणि परीक्षेच्या दिवशी वेळेवर पोहचण्यासाठी उमेदवारांनी एक दिवस आधी परीक्षा केंद्राला भेट देऊन पडताळणी करून घ्यावी.

गेट प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

उमेदवारांसोबत त्यांचे वैध ओळखपत्र आणि गेट प्रवेशपत्र २०२२ असणे आवश्यक आहे.

परीक्षा संपण्याच्या वेळेआधी कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्र सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

परीक्षा केंद्रांमध्ये मोबाईल फोन, घड्याळे आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांना परवानगी नाही.

परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना आभासी वैज्ञानिक कॅल्क्युलेटर (virtual scientific calculators) प्रदान केले जाऊ शकतात.

कच्च्या कामासाठी उमेदवारांना स्क्रिबल पॅड दिले जातील. स्क्रिबल पॅड वापरण्यापूर्वी उमेदवारांना त्यांचे नाव आणि गेट नोंदणी क्रमांक नमूद करावा लागेल. परीक्षेच्या शेवटी, स्क्रिबल पॅड पर्यवेक्षकाकडे परत करणे आवश्यक आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या ५, ६, १२ आणि १३ या तारखांना या परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून २ सत्रात या परीक्षा होतील. पहिले सत्र सकाळी नऊ दुपारी १२ वाजेपर्यंत चालेल तर दुसरे सत्र दुपारी अडीच ते संध्याकाळी साडे पाचपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. भारतीय विज्ञान संस्था (IISc) बेंगळुरू आणि सात भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मुंबई, दिल्ली, चेन्नई (IIT मद्रास) आणि रुरकीद्वारे गेट परीक्षेचे संचालन केले जाते. यंदा गेट २०२२ परीक्षा आयआयटी खरगपूरद्वारे आयोजित केली जात आहे.

The post GATE Admit Card 2022: आजही मिळणार नाही गेट २०२२ प्रवेशपत्र; वेबसाईटवर जाहीर केली नोटीस appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: GATE Admit Card 2022: आजही मिळणार नाही गेट २०२२ प्रवेशपत्र; वेबसाईटवर जाहीर केली नोटीसhttps://ift.tt/3dmx3ZV