Advertisement

December 2021: इग्नूतर्फे जूलै २०२१ सत्राला प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इग्नुतर्फे यूजी आणि पीजी अभ्यासक्रमाच्या अर्ज प्रक्रियेस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याोबतच विद्यापीठाने असाइनमेंट, प्रोजेक्ट रिपोर्ट, डिजर्टेशन, इंटर्नशिप, फील्ड वर्क जर्नल (प्रॅक्टिकल) इत्यादी सादर करण्याची अंतिम तारीख देखील डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवली आहे. इग्नूतर्फे ४ जानेवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आलेल्या अपडेटनुसार, सर्व अभ्यासक्रमांसाठी असाइनमेंट ऑनलाइन/ऑफलाइन सबमिशन करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट रिपोर्ट, डिजर्टेशन, इंटर्नशिप, फील्ड वर्क जर्नल ) इत्यादी सादर करण्याची अंतिम तारीख देखील १५ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. इग्नूद्वारे डिसेंबर २०२१ सत्र परीक्षांसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट, डिजर्टेशन, इंटर्नशिप, फील्ड वर्क जर्नल ) इत्यादी सादर करण्याची अंतिम तारीख तिसऱ्यांदा वाढविण्यात आली आहे. विद्यापीठाने आधी ही तारीख ३१ ऑक्टोबरनंतर ३० नोव्हेंबर केली होती.आधीच्या मुदतवाढीनुसार उमेदवारांना अधिकृत वेबसाइट gnou.ac.in वर जाऊन ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार होता. नव्या अपडेटनुसार उमेदवारांना १५ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. इग्रूच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. अशी करा नोंदणी IGNOU पुनर्नोंदणी फॉर्म २०२२ भरण्यासाठी, सर्वप्रथम IGNOU ची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जा. 'IGNOU Re-Registration' टॅबवर क्लिक करा. 'इग्नू पुनरनोंदणीसाठी पुढे जा' या लिंकवर क्लिक करा. लॉगिन तपशील भरा. इग्नू पुनरनोंदणी फॉर्म भरा. कोर्सच्या यादीमधून अभ्यासक्रम निवडा. आवश्यक तपशील भरा आणि 'नेक्स्ट' बटणावर क्लिक करा. IGNOU पुनरनोंदणी २०२२ शुल्क भरा. नोव्हेंबरपासून नोंदणीची प्रक्रिया IGNOU ने जानेवारी २०२२ सत्रासाठी नोंदणीची प्रक्रिया २ नोव्हेंबरपासून सुरु केली होती. विद्यापीठाद्वारे ऑफर केलेल्या कोणत्याही पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये नोंदणी केलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. विद्यापीठाने जानेवारी २०२२ सत्रासाठी नवीन प्रवेश सुरू केले आहेत.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ignou-extends-last-date-for-submission-of-assignments-for-december-2021-term-end-examinations-submit-online/articleshow/88705446.cms