TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

IIT Directors: दिल्लीसह चार आयआयटींना मिळाले नवे संचालक

Directors: आयआयटी दिल्ली, मद्रास, मंडी आणि इंदूरच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीची घोषणा सोमवारी करण्यात आली. आयआयटी मुंबईचे(IIT Mumbai) प्राध्यापक रंगन बॅनर्जी यांची आयआयटी दिल्लीच्या ( Director) संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आणि कॉर्पोरेट रिलेशनचे डीन सुहास जोशी यांची आयआयटी इंदूरचे संचालक (IIT Indore Director) म्हणून निवड करण्यात आली आहे. आयआयटी कानपूरच्या इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे प्राध्यापक लक्ष्मीधर बेहरा यांना आयआयटी मंडीचे (IIT Mandi) संचालक बनवण्यात आले आहे. भारतातील पहिला स्वदेशी मायक्रोप्रोसेसर डिझाइन करणाऱ्या आयआयटी मद्रासचे प्राध्यापक व्ही कामकोटी यांची संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रोफेसर कामकोटी यांनी भारतातील पहिले स्वदेशी मायक्रोप्रोसेसर 'शक्ती' डिझाइन केले. आयआयटी मद्रासचे विद्यमान संचालक प्रोफेसर भास्कर राममूर्ती यांची जागा ते घेतील. राममूर्ती यांच्या कार्यकाळात आयआयटी मद्रासने सलग तीन वर्षे एकूण श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच सर्वोत्तम इंजिनीअरिंग संस्थेचे प्रथम क्रमांकाचे मानांकनही मिळाले. प्रोफेसर एमेटरिटस आणि कुरुक्षेत्र विद्यापीठाचे रजिस्टार डॉ. रघुवेंद्र तन्वर यांची भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद (ICHR), नवी दिल्लीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाने सोमवारी ही माहिती दिली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सोमनाथ सचदेवा यांनी प्रा. तंवर यांना शुभेच्छा दिल्या. प्रा. तन्वर यांची आयसीएचआर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणे ही संपूर्ण कुरुक्षेत्र विद्यापीठासाठी ही खरोखरच गौरवाची बाब आहे असे कुलगुरु सचदेवा म्हणाले. गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या राजपत्रातील नोटिफिकेशननुसार, आयसीएचआर म्हणून प्रा. तन्वर यांचा कार्यकाळ हा पदभार स्वीकारल्यापासून तीन वर्षांचा असणार आहे. प्रा. तन्वर यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या इतिहास विभागात ४२ वर्षे काम केले असून अध्यक्ष, डीन ऑफ फॅकल्टी, स्टुडन्ट्स वेल्फेअर डीन आणि प्रोफेसर एमेरिटस यासारख्या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/iit-directors-rangan-banerjee-will-be-the-new-director-of-iit-delhi-other-iits-also-get-new-directors/articleshow/88825924.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या