TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Mhada Recruitment Exam: म्हाडा भरती परीक्षा आता ऑनलाइन; रद्द केलेल्या परीक्षेची नवी तारीख जाहीर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई म्हाडा प्राधिकारणाची पेपरफुटीच्या प्रकरणाने ऐनवेळी रद्द करावी लागलेली सरळ सेवा भरती परीक्षा () ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार आहे. राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल, असे म्हाडाने गुरुवारी जाहीर केले आहे. यापूर्वी म्हाडाने ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, पेपरफुटीनंतर म्हाडाने सावध भूमिका घेत ऑनलाइन परीक्षेचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक-अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी आणि ७ ते ९ फेब्रुवारी पर्यंत घेतली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत. या परीक्षेतील सर्व उमेदवारांना म्हाडाकडून एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यावर लिंकवर उमेदवारांना त्यांचा पेपर उत्तरासह पाहता येणार आहे. परीक्षार्थ्यांसाठी सूचना म्हाडाच्या परीक्षेविषयी माहितीसाठी परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटला नियमित स्वरुपात भेट देण्याचे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे. ऑनलाइन परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी म्हाडाच्या https.mhada.gov. in वेबसाइट पाहावी. त्यासाठी २२ जानेवारी पासून https://ift.tt/3AsuZeT ही लिंक दिली आहे. https://ift.tt/3g5FQSN या मॉक लिंकच्या साहाय्याने उमेदवारांना परीक्षेचे सर्वसाधारण स्वरूप समजून घेता येणार येऊ शकते. त्यासह, परीक्षा दिल्यानंतर सर्व उमेदवारांना म्हाडाकडून एक लिंक दिली जाणार आहे. त्यावर, उमेदवारांना त्यांची प्रश्नपत्रिका उत्तरासह पाहता येईल. परीक्षेनंतर प्रश्नपत्रिकेसह उत्तरासह आक्षेप नोंदविण्याचे असल्यास उमेदवारांना तीन दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी म्हाडाकडून ही परीक्षा घेताना सर्व काळजी घेतली जाणार आहे. एखाद्या उमेदवारास करोनासदृश लक्षणे आढळल्यास त्यांच्यासाठी विलगीकरण कक्षाची सुविधा देण्यात येईल. दलालांपासून सावध राहावे म्हाडाने या परीक्षेसाठी कोणत्याही व्यक्ती वा दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि कोणत्याही गैरमार्गांचा अवलंब न करण्याचे आवाहन केले आहे. त्याप्रकारे कोणी प्रलोभन दाखविल्यास त्याची तक्रार म्हाडा प्रशासन, म्हाडा दक्षता व सुरक्षा विभाग किंवा पोलिस ठाण्यात करण्याची सूचना केली आहे. ५६५ पदे भरणार म्हाडाच्या ५६५ रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार असून त्यात कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ पदे, उप अभियंता (स्थापत्य) १३ पदे, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय व्यवस्थापक अधिकारी २ पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) ३० पदे, सहाय्यक विधी सल्लागार २ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १११९ पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ४४ पदे, सहायक सहायक १८ पदे, वरिष्ठ लिपिक ७३ पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक २०७ पदे, लघुटंकलेखक २० पदे, भूमापक ११ पदे, अनुरेखकाच्या ७ पदांचा समावेश आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/mhada-recruitment-exam-to-be-conducted-between-31st-january-to-9th-february/articleshow/89171074.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या