Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १० जानेवारी, २०२२, जानेवारी १०, २०२२ WIB
Last Updated 2022-01-10T05:00:32Z
Rojgar

NEET PG Counselling 2021-22: 'नीट पीजी' समुपदेशन येत्या बुधवारपासून

Advertisement
नवी दिल्ली : 'सन २०२१-२२ या वर्षाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांसाठी () समुपदेशन येत्या बुधवारपासून (१२ जानेवारी) सुरू होणार आहे,' अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीटद्वारे दिली. 'सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे देशाच्या वैद्यकीय सेवेला बळकटी येईल,' असेही मांडविया यांनी म्हटले आहे. नीट-पीजी परीक्षा जानेवारी आणि एप्रिलमध्ये दोनदा पुनर्निर्धारित केल्यानंतर ११ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आली. त्याचे निकाल सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घोषित करण्यात आले. त्यानंतर सुमारे ४५ हजार पदव्युत्तर जागांसाठी विद्यार्थी समुपदेशन सुरू होण्याची वाट पाहत होते. गेल्या महिन्यात देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवासी डॉक्टरांनी समुपदेशनाची गती वाढवण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली आणि कामावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर न्यायालयात त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली होती. IMA चे राष्ट्रीय अध्यक्ष (IMA President) सहजानंद प्रसाद सिंह (Sahajanand Prasad Singh) यांनी ३० डिसेंबर २०२१ रोजी अन्य सदस्यांसह केंद्रीय आरोग्य मंत्री (Health Minister) मनसुख मांडविया यांची भेट घेतली होती. त्यांनी मेडिकल पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होत असलेल्या विलंबावर मार्ग काढण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांना केले होते. डॉक्टर शांतपणे आंदोलन करत असूनही त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जात असल्याकडेही मांडविया यांचे लक्ष वेधले होते.


source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-pg-counselling-2021-to-be-begins-from-12th-january-2021/articleshow/88801560.cms