Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २४ जानेवारी, २०२२, जानेवारी २४, २०२२ WIB
Last Updated 2022-01-24T08:00:44Z
Rojgar

NEET PG काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

Advertisement
Counseling: नीट पीजी २०२१ (NEET PG Admission) प्रवेशासाठी काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC)च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic वर उपलब्ध आहे. नीट पीजी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना पहिल्या फेरीचा निकाल (NEET PG Counselling ) पाहता येणार आहे. नीट पीजी परीक्षा ११ सप्टेंबर २०२१ रोजी झाली. त्यापूर्वी जानेवारी आणि एप्रिलमध्ये दोनदा परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. या काऊन्सेलिंगच्या निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. निकालानंतर उमेदवार २३ जानेवारी ते २८ जानेवारी २०२२ या कालावधीत प्रवेशासाठी अर्ज करू शकतील. NEET-PG २०२१ साठी वाटप केलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि शिक्षण शुल्क भरावे लागेल. समुपदेशनाची दुसरी फेरी ३ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होईल. ज्या अंतर्गत उमेदवारांना डिएनबी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येईल. तर तिसरी फेरी २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. 2021: या स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर जा. होमपेजवर 'फेरी १ जागा वाटप निकाल' या लिंकवर क्लिक करा. नीट पीजी रोल नंबर आणि पासवर्ड असा तुमचा लॉगिन तपशील भरा. काऊन्सेलिंग निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. रिझल्ट डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या. निकालानंतरची प्रक्रिया काऊन्सेलिंग निकालानंतर उमेदवारांना २३ जानेवारी ते २८ जानेवारी २०२२ दरम्यान रिपोर्टिंग करावे लागेल. नीट पीजी २०२१ साठी वाटप केलेल्या महाविद्यालयात प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी, उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि शिक्षण शुल्क भरावे लागेल. समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज ३ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणार आहेत. नीट पीजी काऊन्सेलिंग एमडी/एमएस/डिप्लोमा/पीजी डिएनबी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केले जाते. काऊन्सेलिंग नोंदणी नीट पीजी २०२१ समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी १२ जानेवारी २०२२ रोजी सुरू झाली. नीट पीजी समुपदेशन एमडी/एमएस/डिप्लोमा/पीजी डिएनबी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केले जाते. साधारण २ लाख उमेदवार काऊन्सेलिंग २०२१ च्या निकालाची वाट पाहत होते.


source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-pg-counseling-round-1-result-has-been-released-know-how-to-check/articleshow/89085805.cms