NEET UG 2021: नीट यूजी काऊन्सेलिंग कधी? ऑल इंडिया कोट्यात किती जागा?...वाचा

NEET UG 2021: नीट यूजी काऊन्सेलिंग कधी? ऑल इंडिया कोट्यात किती जागा?...वाचा

NEET UG Counselling 2021: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा अर्थात काऊन्सेलिंग २०२१ () चे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेद्वारे विविध मेडिकल कॉलेजांमधील ऑल इंडिया कोटा जागांवर प्रवेश दिला जातो. मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC)च्या वतीने वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातील जागांवर ऑनलाइन समुपदेशन होणार आहे. उमेदवार एमसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर तपशील पाहू शकतात. राज्य कोट्यांतर्गत एकूण १९२ मेडिकल कॉलेजांमध्ये २३,३७८ एमबीबीएस जागा आहेत. दुसरीकडे २७२ शासकीय महाविद्यालयांमध्ये एकूण ४१,३८८ जागा आहेत. एमबीबीएससाठी ८३,०७५, बीडीएससाठी २६,९४९, आयुषसाठी ५२,७२०, बीवीएससी आणि एएच साठी ६०३, एम्ससाठी १,८९९ आणि जिपमरसाी २४९ जागा उपलब्ध आहेत. काऊन्सेलिंग प्रक्रियेची माहिती एमसीसीची अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर देण्यात येईल. विद्यार्थ्यांना NEET काउन्सेलिंग प्रक्रियेच्या आधारे अखिल भारतीय कोट्यातील १५ टक्के जागांवर प्रवेश मिळतो, उर्वरित ८५ टक्के जागा राज्य कोट्यातील असतात, त्यावर राज्य सरकारद्वारे प्रक्रिया राबवली जाते. एमसीसीने एका नोटीसीद्वारे नीट काऊन्सेलिंग प्रक्रियेत बदल करण्यात असल्याचे जाहीर केले. यानुसार, नीट काऊन्सेलिंग द्वारे १५ % नीट यूजी जागा आणि ५० % नीटी पीजी जागांसाठी निवड चार फेऱ्यांमध्ये केली जाईल. NEET काऊन्सेलिंग 2021 ला होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी नाराज होते. फोर्डाने देखील याला विरोध करत देशभरात आंदोलन छेडले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील प्रलंबित याचिकेवर केंद्राच्या विनंतीनुसार तातडीने सुनावणी घेतली. परिणामी नीट पीजी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही प्रक्रिया १२ जानेवारीपासून सुरू होत आहे. मात्र नीट यूजी काऊन्सेलिंगविषयी अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. हे काऊन्सेलिंग देखील अधिकृतपणे अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. मात्र MCC लवकरच नीट यूजी काऊन्सेलिंगच्या तारखाही जाहीर करेल.


source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-ug-counselling-2021-date-schedule-will-announce-soon-know-total-number-of-seats-under-aiq/articleshow/88813760.cms

0 Response to "NEET UG 2021: नीट यूजी काऊन्सेलिंग कधी? ऑल इंडिया कोट्यात किती जागा?...वाचा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel