Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी २५, २०२२ WIB
Last Updated 2022-02-24T19:48:43Z
करिअर वृत्तान्त – LoksattacareerResults

एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र गट – क सेवा (पूर्व)परीक्षा बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित : अचूकता गरजेची

Advertisement

सुनील तु. शेळगावकर

उमेदवार किती अचूकपणे व लवकर विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी आणि निर्णयाची परिणामकारकता तपासण्यासाठी जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षेत हा घटक अनिवार्य पद्धतीने समाविष्ट असतो. महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षेसाठी हा घटक तसा सोपा असणार आहे. कारण,या परीक्षेची काठिण्यपातळी बारावी आहे! आज आपण या घटकाची नेमकी तयारी कशी केली पाहिजे या विषयी माहिती घेऊ या. या घटकासाठी विद्यार्थ्यांनी आधी  अंकगणिताची तयारी केल्यास ते हिताचे ठरेल. कारण अंकगणितातील अंगभूत कौशल्याचा वापर आपल्याला बुद्धिमापन चाचणीसाठी करावा लागतो.

  •    अंकगणित अभ्यासक्रम :

बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक व टक्केवारी

  •    अंकगणित अभ्यासपद्धती:

अंकगणिताचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपणास किमान तीसपर्यंतचे पाढे, तीसपर्यंतचे वर्ग, दहापर्यंतचे घन पाठ पाहिजे. सुरुवातीला पूर्णाकाची बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार जमला पाहिजे. त्याचप्रमाणे कंसाचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सोडवता आले पाहिजेत. या सरावानंतर ल.सा.वि. आणि म.सा.वि. या दोन उपघटकांचा अभ्यास केला पाहिजे.

यानंतर अपूर्णाक, पूर्णाकायुक्त अपूर्णाक, दशांश अपूर्णाक यांचा अभ्यास केला पाहिजे . याशिवाय टक्केवारी आणि गुणोत्तर प्रमाण व घातांक यांचा अभ्यास केल्यास कोणत्याही गणितीक्रिया आणि सूत्रे सहज लक्षात राहातात. सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांचा कल शॉर्टकट पद्धती शोधण्यावर जास्त असतो. म्हणून उपरोक्त पायऱ्याच्या आधारे ते या घटकाचा पूर्ण अभ्यास न करता शॉर्टकटवर अवलंबून राहतात इथेच त्यांची फसगत होते. अधिक सरावाने आपसूकच शॉर्टकट अवगत होतात हे विसरून चालणार नाही. 

  •    अभ्यास साहित्य :

गणिताच्या अभ्यासासाठी इयत्ता ५ वी व ८वीची शिष्यवृत्तीची पुस्तके उपयोगी ठरतात. काठिण्यपातळी आणि प्रश्नप्रकार लक्षात घेण्यासाठी तत्सम काठिण्यपातळीच्या आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा आधार घ्यावा.

  •    बुद्धिमापन चाचणी :

बुद्धिमापन चाचणीचे दोन गटात वर्गीकरण केले जाते. शाब्दिक आणि अशाब्दिक (Verbal and Non- Verbal)या दोन्ही प्रकारच्या अभ्यासाकडे जाण्यापूर्वी या घटकाची पूर्वतयारी म्हणून अंकगणितात सांगितलेल्या बाबीसह  ABCD क्रमाने उलटी व सुलटी पाठ असणे; एक,दोन आणि तीन अल्फाबेट्स सोडून उलटी सुलटी माहिती असणे गरजेचे आहे.

  •    अभ्यास पद्धती :

बुद्धिमत्ता चाचणीचे शाब्दिक व अशाब्दिक प्रमुख दोन भाग याअंतर्गत येणारे सर्व उपघटक यांची विभागणी करा. उदाहरणार्थ: शाब्दिक बुद्धिमत्ता चाचणी या प्रकारात तर्कशास्त्रीय युक्तिवाद, वेन आकृत्या आणि गणितीय उदाहरणे यांचा समावेश होतो तर; अशाब्दिक बुद्धिमत्ता चाचणी या प्रकारात आकृत्यांवर आधारित प्रश्नाचा समावेश होतो. सुरुवातीला दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकाराची पूर्ण तयारी करावी मगच दुसऱ्या प्रकाराकडे जावे. जसे की, अगोदर शाब्दिक बुद्धिमत्ता या घटकाची तयारी करूनच अशाब्दिक बुद्धिमत्ता या घटकाची तयारी करावी.  यातील उपघटक पूर्णपणे समजून घेताना मांडणीतील तर्क,सूत्र किंवा संगती कोणत्या प्रकारे निर्माण झाली आहे हे समजून घावे; नंतर त्याचे सर्व प्रकार समजून घ्यावेत.

जितका जास्त सराव तितकी जास्त अचूकता आणि शॉर्टकट सुचत जातात म्हणून; सरावाला किंबहुना अधिकच्या सरावाला कोणीही टाळू नये. हा घटक इतर कोणत्याही घटकांपेक्षा सरावाअंती सर्वाधिक गुण देणारा आहे.कारण; प्रक्रियेअंती येणारे सर्व उमेदवारांचे आठवलेले किंवा सोडवलेले अचूक उत्तर हे एकच असते. स्पर्धा परीक्षा कोणतीही असो हमखास यश मिळवण्यासाठी या घटकाचा रोज किमान एक ते दोन तास न चुकता सराव करावा.

  •    अभ्यास साहित्य :

बुद्धिमापन चाचणीच्या अभ्यासासाठी इयत्ता ५ वी व ८ वीची शिष्यवृत्तीची पुस्तके उपयोगी ठरतात. काठिण्यपातळी आणि प्रश्नप्रकार लक्षात घेण्यासाठी तत्सम काठिण्यपातळीच्या आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा आधार घ्यावा.

  •    अंतिम सत्य :

गतिमानता आणि अचूकता या दोन अभ्यासकौशल्यावर या घटकाचे परीक्षेतील यशापयश अवलंबून आहे. अभ्यासाअंती आयोगाच्या तत्सम अभ्यासक्रम आणि काठिण्यपातळीच्या मागील परीक्षेत या घटकावर विचारलेले प्रश्न, प्रश्नप्रकार नेमके कोणकोणते आहेत हे जुन्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे पडताळून पाहणे गरजेचे आहे. अधिक सरावासाठी बाजारातील जास्तीत जास्त पुस्तकांचा वापर करावा परंतु एखाद्या लेखकाने सांगितलेले शॉर्टकट आत्मसात करण्याअगोदर तो घटक तुम्हाला तुमच्या पद्धतीने समजला आहे का हे पहा. प्रत्येक उदाहरणाला प्रत्येक शॉर्टकट लागू पडतेच असे नाही याचे भान उमेदवाराने बाळगणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही यशाला प्रत्येकवेळी एखादा पर्यायी शॉर्टकट असेलच असे नाही.

The post एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र गट – क सेवा (पूर्व)परीक्षा बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित : अचूकता गरजेची appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र गट – क सेवा (पूर्व)परीक्षा बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित : अचूकता गरजेचीhttps://ift.tt/5VT1SuM