उच्च शिक्षणाला ऑफलाइन मुभा; यूजीसीच्या सूचना

उच्च शिक्षणाला ऑफलाइन मुभा; यूजीसीच्या सूचना

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई उच्च शिक्षणावर नियंत्रण करणारी शिखर परिषद असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षण पुन्हा ऑफलाइन सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. प्रत्येक राज्याने तेथील स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असेही आयोगाने सूचित केले आहे. करोनामुळे गेली दोन वर्षे ऑनलाइन सुरू असलेले उच्च शिक्षण अखेर ऑफलाइन सुरू करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने सूचना केल्या आहेत. सध्याची करोनाची स्थिती लक्षात घेता आयोगाने ऑफलाइन कॉलेजे सुरू करण्याबाबत सूचना केली आहे. ज्या भागात शक्य नाही, तेथे ऑनलाइन; तर काही भागांत ऑनलाइन; तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने वर्ग चालवावेत, असे आयोगाने नुकत्याच काढलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने; तसेच राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घ्यावा, असेही आयोगाने म्हटले आहे. करोनाकाळात आयोगाने वेळोवेळी उच्च शिक्षणाबाबत योग्य त्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. आयोगाच्या या सूचनेमुळे उच्च शिक्षण पुन्हा ऑफलाइन सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संस्थांनी करोनाप्रतिबंध पूरक नियमांचे पालन करून ऑफलाइन शिक्षण सुरू करावे, असेही आयोगाने नमूद केले आहे. केंद्र सरकारने शाळा, कॉलेजे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्याचे काटेकोर पालन करावे, असेही आयोगाने म्हटले आहे. राज्यात कॉलेजांना अल्प प्रतिसाद राज्यात एक फेब्रुवारीपासून ऑफलाइन वर्ग भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, सध्या याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. यातच सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंतच्या नियोजित परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर परीक्षांचे प्रत्यक्ष आयोजनही करण्यात येईल, यानुसार विद्यापीठांनी तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.


source https://maharashtratimes.com/career/career-news/colleges-universities-can-reopen-for-offline-classes-exams-following-covid-protocols-informs-ugc/articleshow/89566286.cms

0 Response to "उच्च शिक्षणाला ऑफलाइन मुभा; यूजीसीच्या सूचना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel