TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

मुंबई विद्यापीठ आयडॉलच्या एम.ए., एम.कॉम ऑनलाइन परीक्षा लांबणीवर

मुंबई विद्यापीठाच्या () दूरस्थ शिक्षण विभागाच्या एम.ए. (MA) आणि एम. कॉमच्या (MCom) परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. गानसम्राज्ञी यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने सोमवारी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. परिणामी ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आयडॉलच्या एम.ए. आणि एम. कॉम. परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठाने कळवले आहे. मुंबई विद्यापीठाने यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, आयडॉलच्या सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाची दूर व मुक्त अध्ययन संस्था सोमवारी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी बंद राहणार आहे. परिणामी ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या एम.ए. आणि एम. कॉम अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


source https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-idol-ma-and-mcom-exams-scheduled-to-be-held-on-7th-february-postponed-due-to-sad-demise-of-lata-mangeshkar/articleshow/89391266.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या