TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

आदिवासी विद्यार्थ्यांचे जडणार 'आकाशा'शी नाते

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई आदिवासी मुलांसह सर्वांना खगोलशास्त्र शिकविण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा ध्यास पुणेकर या तरुणीने घेतला आहे. तिच्या ध्यासाला ''चीही साथ मिळाली असून, तिचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जगातील अंतिम १७ प्रकल्पांमध्ये निवडला गेला आहे. यासाठी तिला पाच हजार युरोचे आर्थिक साह्यही मिळणार आहे. 'आंतरराष्ट्रीय अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन'खगोलशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 'ऑफिस ऑफ अॅस्ट्रॉनॉमी डेव्हलपमेंट'अंतर्गत जगभरातील निवडक प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देतात. यासाठी मागविण्यात आलेल्या अर्जांमध्ये यंदा जगभरातून ९७ संस्थांनी अर्ज केले होते. यामध्ये श्वेताच्या 'अॅस्टोनएरा'या संस्थेचाही अर्ज होता. या अर्जांतील शंकांबाबत श्वेता आणि तिच्या टीमला संस्थेकडून खूप सारे प्रश्न विचारणारा मेल आला. त्याची योग्य ती उत्तरे देऊन त्यांनी अंतिम ४२ प्रकल्पांमध्ये स्थान मिळवले. यानंतर पुन्हा एक चाळणी लागली आणि अंतिम १७मध्ये 'अॅस्ट्रोनएरा'ची निवड झाली. यानंतर या संस्थांना पाच हजार युरोचे आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या निधीतून राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे ज्ञान देऊन त्यांना खगोलशास्त्राच्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्याचा श्वेताचा मानस आहे. लहानपणापासून खगोलशास्त्राची आवड असलेल्या श्वेताचे शालेय शिक्षण पुण्यातील अक्षरनंदन शाळेत झाले. २००९मध्ये 'आंतरराष्ट्रीय अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन'ने खगोल प्रचारासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्याचे आवाहन जगभरातील खगोलप्रेमींना केले होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोविंदस्वरूप यांनी यामध्ये सहभागी होण्याबद्दल श्वेताला सांगितले. तेव्हा तिने भीमाशंकर येथे दुर्बिण नेऊन कार्यक्रम केला होता. तेव्हापासून ती 'युनियन'शी जोडली गेली. तिची खगोलशास्त्राची आवड लक्षात घेऊन १६व्या वाढदिवशी तिच्या आई-वडिलांनी तिला एक दुर्बिण भेट दिली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची भेट झाली, तेव्हा श्वेताने त्यांना खगोलशास्त्रातील ई-लर्निंगची संकल्पना सांगितली. ती त्यांना इतकी आवडली, की त्यांनी तिला विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या एका योजनेत अर्ज करण्यास सांगितले. तिने अर्ज केल्यानंतर तो निवडला गेला. यानंतर या योजनेअंतर्गत २०१८मध्ये तिने 'आयआयएम बेंगळुरू'मध्ये जाऊन स्टार्ट-अपचे प्रशिक्षण घेतले आणि या क्षेत्रातील रोजगारसंधीचे द्वार तिने खुले केले. तत्पूर्वी घरून दुर्बिण मिळाल्यानंतर ती मित्र-मैत्रिणींसोबत आकाशदर्शनाचे कार्यक्रम करू लागली. यासाठी तिने या संस्थेची नोंदणी केली होती. वयाच्या २१व्या वर्षी ती 'अॅस्ट्रॉनएरा'ची मुख्य कार्यकारी अधिकारी झाली. पुढे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आणि इतर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानंतर तिने राज्यातील आश्रमशाळा, एकलव्य शाळा अशा शाळांमध्ये मराठीतून खगोलशास्त्राचे धडे देणारे अभ्यासक्रम राबविण्यास सुरुवात केली. याचाच पुढाचा भाग म्हणजे हा प्रकल्प असेल असे श्वेता सांगते. याचबरोबर श्वेताचे ऑनलाइन वर्गही असून, तिथे सध्या सहा हजारांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. अशी होणार निवड आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात किती आवड आहे, यासाठी एक चाळणी परीक्षा घेऊन अंतिम १५ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार असल्याचे श्वेता सांगते. त्यांना प्रशिक्षण देऊन आकाशदर्शनासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करून ते विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहीपर्यंतची जबाबदारी घेतली जाणार आहे. यामध्ये श्वेताच्या नेतृत्वाखाली मिहीर आठले, सुशांत सुतरावे, अजय पेरके, ऐश्वर्या खाडे, श्रुती टोपकर, श्रेया जोशी आदी १२ तरुणांची काम करणार आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/astronomical-organization-astron-era-of-shweta-kulkarni-was-selected-among-the-17-worldwide-winners-for-the-international-astronomical-union-fellowship/articleshow/89495385.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या