Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी १२, २०२२ WIB
Last Updated 2022-02-12T10:00:23Z
Rojgar

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये भरती, जाणून घ्या तपशील

Advertisement
2022: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन ( Of India Recruitment 2022) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाअंतर्गत विशेषज्ञ अधिकारी आयटी आणि सिनिअर मॅनेजर ( Information Technology, Senior Manager) पदाच्या एकूण १९ जागा भरण्यात येणार आहेत. स्पेशलिस्ट ऑफिसर इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, सिनिअर मॅनेजर पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे सायन्स / आयटी / ईसीई किंवा एमसीए / एमएससी (आयटी) / एमएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संबंधित कामाचा ६ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. शेल स्क्रिप्टींग, युनिक्स फाइल सिस्टिम मॅनेजमेंट, युनिक्स पॅच मॅनेजमेंटचा अनुभव असावा. तसेच काम एकट्याने हाताळता यावे. यासाठी उमेदवाराचे वय ३५ वर्षापर्यंत असावे. या पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ६३ हजार ८४० ते ७८ हजार २८० पर्यंत पगार मिळू शकणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५० रुपये अधिक जीएसटी असा अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी १७५ रुपये अधिक जीएसटी इतका इर्ज शुल्क भरावा लागणार आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/cboi-recruitment-specialist-officers-post-vacant-in-central-bank-of-india/articleshow/89521107.cms