Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी १२, २०२२ WIB
Last Updated 2022-02-12T09:00:43Z
Rojgar

IGNOU जानेवारी २०२२ सत्राच्या प्रवेशाला मुदतवाढ

Advertisement
Admissions 2022: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे (Indira Gandhi National Open University, IGNOU)जानेवारी सत्रासाठी होणाऱ्या प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे. इग्नूने ओपन आणि डिस्टन्स मोड (ODL) आणि ऑनलाइन माध्यमातून ऑफर केलेल्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम मुदत वाढविली आहे. उमेदवारांना २१ फेब्रुवारीपर्यंत अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in च्या माध्यमातून आणि ओडीएल प्रोग्रामसाठी ignouiop.samarth.edu.in वर अर्ज करता येणार आहे. यापूर्वी अर्ज प्रक्रिया १० फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आली होती. जानेवारी सत्रासाठी नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख देखील वाढविण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवार २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. इग्नूने जारी केलेल्या प्रेस रिलीझमध्ये दिलेल्या निर्देशानुसार, विद्यार्थ्यांनी सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यानंतर नोंदणी करावी. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट onlinerr.ignou.ac.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे. दरम्यान, इग्नूने १८ जानेवारी २०२२ रोजी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) सह व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण उच्च शिक्षणाशी जोडण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. तरुणांसाठी कामाच्या संधी निर्माण करणे आणि व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण फ्रेमवर्क मजबूत करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे. असा करा अर्ज उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर जा. 'Application Process' या लिंकवर क्लिक करा. क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि लॉगिन करा. अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट वर क्लिक करा. अर्ज सबमिट केल्यावर प्रत डाउनलोड करा. पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या. IGNOU तर्फे २०० हून अधिक ओडीएल अभ्यासक्रम आणि १६ ऑनलाइन अभ्यासक्रम शिकविले जातात. कार्यक्रमांची सविस्तर यादी आणि इतर माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ओडीएल अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या एससी/एसटी विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत देण्यात येते. अधिकृत निवेदनानुसार, जवळपास ३२ NSTIs, ३००० ITIs, ५०० PMKKs आणि ३०० JSSs नोंदणी, परीक्षा आणि कार्य केंद्रे म्हणून विद्यापीठाशी जोडले जाणार आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर अर्ज भरु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ने स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अंतर्गत बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) संस्कृत (BASKH) आणि बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) उर्दू (BAUDH) अभ्यासक्रम सुरू केले आहेत. याअंतर्गत सन २०२२ ची प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. नुकताच या अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यूजी आणि पीजी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार ssc@ignou.ac.in हा ईमेल आयडी आणि ०११-२९५७२५१३ आणि २९५७२५१४ या क्रमांकांद्वारे इग्नूशी संपर्क साधू शकतात.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ignou-admissions-2022-admission-date-for-ignou-january-session-extended-can-apply-till-21-february-2022/articleshow/89519695.cms