
UGC NET 2021: यूजीसी नेट परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर
शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२
Comment

NET 2021: यूजीसीकडून नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ () नेट परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार यूजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) कडून नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी निवड केली जाईल. याअनुशंगाने राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) च्या डिसेंबर २०२० आणि जून २०२१ सत्रांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यूजीसी नेट २०२१ ची परीक्षा ८१ विषयांसाठी घेण्यात आली होती. यूजीसी नेटची अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर पुढील स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहताा येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. 2021: असा पाहा निकाल स्टेप १: अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा. स्टेप २: यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा. स्टेप ४: तुमच्या विषयाच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ५: निकाल डाउनलोड करा. स्टेप ६: निकालाची प्रिंट काढा. यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ सत्र परीक्षा एनटीएने करोना प्रादुर्भावामुळे उशिरा आयोजित केल्या होत्या. एजन्सीने २० नोव्हेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत दोन्ही सत्रांच्या परीक्षा तीन टप्प्यांत घेतल्या होत्या. एनटीएकडून मिळेल प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना राष्ट्रीय पात्रता चाचणी प्रमाणपत्र जारी केले जाईल. उमेदवार विविध ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) किंवा विद्यापीठे किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांमधील रिक्त पदांसाठी त्यांच्या संबंधित विषयातील यूजीसी नेट प्रमाणपत्राद्वारे अर्ज करू शकतील.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ugc-net-2021-nta-released-ugc-net-result-check-on-official-website-ugcnetntanicin/articleshow/89665373.cms
0 Response to "UGC NET 2021: यूजीसी नेट परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर"
टिप्पणी पोस्ट करा