Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १२ मार्च, २०२२, मार्च १२, २०२२ WIB
Last Updated 2022-03-12T06:00:09Z
Rojgar

CBSE दहावी टर्म १ चा निकाल जाहीर, येथे पाहा अपडेट

Advertisement
CBSE 10th Result 2021: सीबीएसई इयत्ता दहावी टर्म १ परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) संबंधित शाळांना दहावी टर्म १ च्या मार्कशीट पाठविण्यात आल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने शाळांना ईमेलकरुन यासंदर्भातील माहिती दिली. दहावीच्या शाळा कोडच्या सत्र २०२१-२२ च्या सत्र १ परीक्षेच्या निकालासंदर्भात यात सूचना करण्यात आली आहे. असे असले तरीही सीबीएसई इयत्ता दहावी निकाल २०२२ च्या घोषणेबाबत अधिकृत नोटिफिकेशनची वाट पाहिली जात आहे. सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावीच्या परीक्षा ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आल्या. विद्यार्थी संबंधित शाळा प्राधिकरणाला भेट देऊन त्यांचे स्कोअर कार्ड गोळा करू शकतात. स्कोअरकार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय गुणांचा तपशील असू शकतो. शाळा अधिकारी त्यांच्या अधिकृत शैक्षणिक मेल आयडीद्वारे निकाल पाहू शकतात. अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर झालेला नाही यावेळी सीबीएसईने दहावी टर्म १ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केलेला नाही. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर होतील, अशी शक्यता यापूर्वी वर्तवली जात होती. शाळांकडून विद्यार्थ्यांचा निकाल डाउनलोड करून विद्यार्थ्यांना दिला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/cbse-10th-result-2021-declared-cbse-10th-term-1-result-released-check-updates-here/articleshow/90163857.cms