RRB NTPC: मे महिन्यात होणार सीबीटी २ परीक्षा

RRB NTPC: मे महिन्यात होणार सीबीटी २ परीक्षा

आणि गट D परीक्षा निकालाच्या वादावर तोडगा काढण्यासंदर्भात, रेल्वे भरती मंडळाने उमेदवारांच्या मागण्या मान्य केल्या आहेत आणि एप्रिलमध्ये सुधारित निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, बोर्डाने rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाइटवर CBT 2 परीक्षेसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ज्या अंतर्गत वेतन स्तर 6, CBT-2 साठी संगणक आधारित चाचणी मे २०२२ मध्ये घेतली जाईल. अधिसूचनेनुसार, बोर्ड लवकरच इतर वेतन स्तरांसाठी CBT-II परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करेल. योग्य कालावधीच्या अंतराने या परीक्षांचे आयोजन केले जाईल. लेव्हल ६ पदांसाठी वेतनश्रेणी ३५,४०० रुपयांपासून सुरू होते. कमर्शियल अप्रेंटिस आणि स्टेशन मास्टरसाठी वेतन स्तर 6 अंतर्गत भरती केली जाईल. CBT-2 परीक्षेचे पॅटर्न CBT-2 परीक्षा दीड तासांची असेल. एकूण १२० प्रश्न असतील, जे MCQ प्रकारचे असतील. प्रत्येक प्रश्नाला १ गुण असेल. त्यात नकारात्मक गुणांकनाचाही समावेश असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.३३ गुण वजा केले जातील. पेपरमध्ये जनरल अवेअरनेस, मॅथेमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगशी संबंधित प्रश्न विचारले जातील. CBT 2 परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेले किमान पात्रता गुण मिळवणे आवश्यक आहे. जे कट ऑफ गुण मिळवतील त्यांची पुढील फेरीसाठी निवड केली जाईल. प्रत्येक श्रेणीसाठी कट ऑफ भिन्न आहे. प्रवर्गनिहाय कट ऑफ पुढीलप्रमाणे आहे - सामान्य - ४० टक्के इडब्ल्यूएस - ४० टक्के ओबीसी - ३० टक्के एससी -३० टक्के एसटी - २५ टक्के किती पदांची होणार भरती? पे लेवल ६ साठी एकूण ७,१२४ रिक्त पदांसाठी भरती केली जाईल. CBT-II परीक्षेसाठी निवडलेल्या १.४२ लाख उमेदवारांपैकी पात्र उमेदवारांची भरती गुणवत्ता आणि आरक्षण धोरणांच्या आधारे निश्चित केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना भरतीपूर्वी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत उपस्थित राहावे लागेल. निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल.


source https://maharashtratimes.com/career/career-news/rrb-ntpc-cbt-2-exam-2022-will-be-held-on-may-know-exam-pattern-cut-off-and-other-details/articleshow/90145304.cms

0 Response to "RRB NTPC: मे महिन्यात होणार सीबीटी २ परीक्षा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel