Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ८ मार्च, २०२२, मार्च ०८, २०२२ WIB
Last Updated 2022-03-08T11:00:19Z
Rojgar

IIT मुंबईकडून CEED निकाल जाहीर, थेट लिंकवरुन 'येथे' तपासा

Advertisement
2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (Indian Institute of Technology, ) ने मास्टर ऑफ डिझाइन (MDes) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार आयआयटी मुंबईच्या अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. हा निकाल उमेदवारांनी सुचवलेले बदल किंवा हरकती लक्षात घेऊन तयार केलेल्या अंतिम उत्तरतालिकेवर आधारित आहे. आयआयटी मुंबईने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, स्कोअर कार्ड १२ मार्च २०२२ ते १४ जून २०२२ पर्यंत उपलब्ध असेल. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना १८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत नोंदणी करता येणार होती. २३ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या परीक्षेसाठी सीईईडी निकाल २०२२ जाहीर झाला आहे. आयआयटी मुंबईने या परीक्षेसाठी २५ जानेवारी २०२२ रोजी तात्पुरत्या उत्तरतालिका जाहीर केल्या आहेत. सीईईडी परीक्षा देणारे विद्यार्थी आता अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर त्यांचे निकाल ऑनलाइन पाहू शकतात. CEED Result 2022: असा पाहा निकाल CEED निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- ceed.iitb.ac.in वर जा. वेबसाइटच्या होमपेजवरील अपडेट्स वर जा. यानंतर CEED 2022 निकाल जाहीर झालेल्या लिंकवर क्लिक करा. आता लॉगिन करा आणि निकाल तपासा. निकाल सेव्ह करा. महत्वाची सूचना CEED २०२२ चा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार १२ मार्च २०२२ पासून त्यांचे सीईईडी स्कोअर कार्ड डाउनलोड करु शकतील. उमेदवारांना १४ जून २०२२ ही स्कोअर कार्ड डाऊनलोड करण्याची शेवटची तारीख आहे. मुंबईसह दिल्ली, बंगळुरू, गुवाहाटी, हैदराबाद, कानपूर, रुरकी येथील आयआयटी आणि IIITDM मधून चालविल्या जाणाऱ्या मास्टर ऑफ डिझाईन (M.Design) आणि PhD अभ्यासक्रम २०२२ मध्ये प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी CEED २०२२ घेतली जाते. यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. ही परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आली होती. १० मार्च रोजी UCEED २०२२ चा निकाल दुसरीकडे, विविध आयआयटीमध्ये आयोजित केलेल्या डिझाईनमधील अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या UCEED २०२२ चा निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहे. या परीक्षांसाठी १६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज आले होते आणि ही परीक्षा २३ जानेवारीला झाली होती. यानंतर तात्पुरती उत्तरतालिका २५ जानेवारीला आणि अंतिम उत्तरतालिका ३१ जानेवारीला जाहीर करण्यात आली. यूजी प्रवेश परीक्षेचे स्कोअरकार्ड १४ मार्चपासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ceed-result-2022-iit-bombay-released-ceed-result-check-here-from-direct-link/articleshow/90074109.cms