Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी, ५६ हजाराहून अधिक पगार

Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी, ५६ हजाराहून अधिक पगार

Indian Army Recruitment 2022: भारतीय लष्कराने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) साठी अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिलांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार आजपासून म्हणजेच ८ मार्च २०२२ पासून अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in द्वारे इंडियन आर्मी एसएससी टेक २०२२ साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल २०२२ आहे.

रिक्त जागांचा तपशील

या मोहिमेद्वारे भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या एकूण १९१ पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये १७५ पदे अविवाहित पुरुषांसाठी, १४ पदे अविवाहित महिलांसाठी आणि २ पदे संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी आहेत. एसएसबी मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. शॉर्ट सर्व्हिस कमिशन (तांत्रिक) कोर्स ऑक्टोबर २०२२ पासून ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA), चेन्नई, तामिळनाडू येथे सुरू होईल.

(हे ही वाचा: Recruitment 2022: बँकेत पदवीधरांसाठी नोकरीची संधी! पगार ८९ हजारांहून अधिक)

पात्रता काय?

भारतीय सैन्यात या पदांसाठी भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या पदांवरील निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान दरमहा रु ५६१०० स्टायपेंड देखील दिला जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

(हे ही वाचा: Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात अधिकारी पदांसाठी भरती, महिला देखील करू शकतात अर्ज)

सर्व पात्र उमेदवार भारतीय लष्कराच्या वेबसाइट joinindianarmy.nic.in द्वारे ६ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइट तपासा.

The post Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी, ५६ हजाराहून अधिक पगार appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी, ५६ हजाराहून अधिक पगारhttps://ift.tt/XzbNZ3l

0 Response to "Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी, ५६ हजाराहून अधिक पगार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel