Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २ मार्च, २०२२, मार्च ०२, २०२२ WIB
Last Updated 2022-03-02T09:00:39Z
Rojgar

SSC Job: बारावी उत्तीर्णांना ९२ हजारपर्यंत पगार घेण्याची संधी, 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

Advertisement
SSC CHSL Recruitment 2022: भारत सरकार () मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शने () एसएससी सीएचएसएल भरती २०२२ () एलडीसी (LDC), जेएसए (JSA), पीए (PA), एसए (SA) आणि डिईओ (DEO) ही पदे भरली जाणार आहे. या पदासाठी ७ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी (SSC CHSL Recruitment 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करु शकणार आहेत. या पदांसाठी (SSC CHSL Recruitment 2022) अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ मार्च आहे. याव्यतिरिक्त उमेदवारांना https://ift.tt/20YGFqh या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी (SSC CHSL Recruitment 2022) थेट अर्ज करता येणार आहे. याव्यतिरिक्त https://ift.tt/5WHilmD या लिंकद्वारे अधिकृत नोटिफिकेशन (SSC CHSL Recruitment 2022) देखील पाहू शकता. या भरती (SSC CHSL recruitment 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण ४७२६ पदे भरली जातील. SSC CHSL Recruitment 2022: महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख - ०१ फेब्रुवारी २०२२ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०७ मार्च २०२२ एसएससी सीएचएसएल भरती २०२२ साठी रिक्त जागांचा तपशील एकूण पदांची संख्या- ४७२६ SSC CHSL Recruitment 2022: पात्रता निकष उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. SSC CHSL Recruitment 2022: वयोमर्यादा उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावी. SSC CHSL Recruitment 2022 : अर्ज शुल्क उमेदवारांकडून १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. SSC CHSL Recruitment 2022: निवड प्रक्रिया सीबीटी, डिस्क्रिप्टिव्ह पेपर आणि टायपिंग चाचणी/कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. SSC CHSL Recruitment 2022: पगार लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) / ज्युनिअर सचिवालय सहाय्यक (JSA): वेतन स्तर-२ (रु. १९ हजार ९०० ते ६३, २००) पोस्टल असिस्टंट (पीए) / शॉर्टनिंग असिस्टंट (एसए): वेतन स्तर-४ (रु. २५ हजार ५०० ते ८१ हजार १००) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO): वेतन स्तर- ४ (रु. २५ हजार ५००- ८१ हजार १००) आणि स्तर-५ (रु. २९ हजार २००-९२ हजार ३००) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड 'ए': वेतन स्तर-४ (रु. २५ हजार ५००- ८१ हजार १००)


source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-chsl-recruitment-2022-few-days-are-left-to-apply-for-these-posts-in-government-of-india-apply-for-12th-pass/articleshow/89939340.cms