Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ५ मार्च, २०२२, मार्च ०५, २०२२ WIB
Last Updated 2022-03-05T08:00:44Z
Rojgar

SSC MTS टियर १ चा निकाल जाहीर, जाणून घ्या तपशील

Advertisement
Result 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे टियर १ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून या निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर MTS टियर १ निकाल २०२०-२१ (MTS Tier 1 2020-21) जाहीर केला आहे. टियर १ परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर त्यांचा निकाल पाहू शकतात. एसएससी एमटीएस २०२१ चा निकाल पीडीएफ फाइलमध्ये जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांच्या रोल नंबरच्या मदतीने एसएससी एमटीएस निकाल टियर १ निकाल पाहता येणार आहे. एसएससी एमटीएस निकालाची तारीख २०२०-२१: महत्त्वाच्या तारखा एसएससी एमटीएस परीक्षेच्या तारखा २०२०-२१- ५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ एसएससी एमटीएस टियर १ निकाल- ४ मार्च २०२२ अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्याची तारीख - १४ मार्च २०२२ एसएससी एमटीएस स्कोअरकार्ड २०२१ - १४ मार्च ते १३ एप्रिल २०२२ SSC MTS 2021 Result: असा पाहा निकाल एसएससी एमटीएस २०२१ चा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा. होमपेजवर, 'एसएससी एमटीएस टियर १ निकाल २०२० टियर २ परीक्षेसाठी उमेदवारांची घोषणा' असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. तुमचे नाव आणि रोल नंबर शोधण्यासाठी पीडीएफ फाइल खाली स्क्रोल करा. निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा. ५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत झालेल्या परीक्षेसाठी एसएससी एमटीएस टियर १ चा निकाल २०२०-२१ जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आता टियर २ परीक्षेस बसण्यास पात्र असतील. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर परीक्षेशी संबंधित अधिक माहिती मिळू शकणार आहे. एसएससी एमटीएस २०२१ ची अंतिम उत्तरतालिका १४ मार्च २०२२ रोजी अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली जाईल. एसएससी एमटीएस टियर १ निकालामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी उपस्थित राहावे लागेल. एसएससी एमटीएस पेपर २ हा वर्णनात्मक प्रकारचा पेपर असेल. सर्व उमेदवारांना एसएससी एमटीएस पेपर २ परीक्षा २०२१ पूर्ण करण्यासाठी ३० मिनिटे दिली जातील याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-mts-result-2021-ssc-mts-tier-1-result-declared-know-details-on-sscnicin/articleshow/90010417.cms