Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ५ मार्च, २०२२, मार्च ०५, २०२२ WIB
Last Updated 2022-03-05T09:00:08Z
Rojgar

कृषी विद्यापीठांमध्ये पीजी प्रवेश परीक्षांसाठी सीईटीच्या तारखा जाहीर

Advertisement
रत्नागिरी: कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 'सामाईक प्रवेश परीक्षा २०२२' ही ११ ते १३ जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना २८ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र परीक्षा मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यात ही परीक्षा १७ केंद्रावर होणार आहे. या परीक्षेसाठी संबंधित विद्याशाखेचे पदवीधर आणि २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी पात्र राहणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या नमुन्यातील ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर भरायचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचणे गरजेचे असल्याचे परीक्षा मंडळातर्फे कळवण्यात आले आहे. दरम्यान कृषी अभियांत्रिकी विषयातील एमएस्सी प्रवेश परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात ४जून होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठाची महाविद्यालय बंद होती.यावर्षी हा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरळीत वेळेवर होऊन महाविद्यालयात अभ्यासक्रम सुरळीत सुरू होऊन नेहमीप्रमाणे अध्ययन सुरू होईल अशी शक्यता आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना समस्यांना तोंड दयावे लागत होते. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा नाहीत त्यामुळे त्याचा परिणाम जाणवत होता. आता या प्रवेश परीक्षा झाल्यावर पुढिल प्रक्रिया सुरळीत होईल.


source https://maharashtratimes.com/career/career-news/pg-course-admission-of-agriculture-universities-dates-of-cet-announced-by-mcaer/articleshow/90010890.cms