TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

7th May 2022 Important Events : 7 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

7th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 7 मे चे दिनविशेष.

1861 : पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म.

रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक होते. ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते. हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते. ते 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले. गीतांजली हा त्यांचा सर्वात लोकप्रिय कवितासंग्रह आहे. रवींद्रनाथांनी रचलेली 'जन गण मन' आणि 'आमार शोनार बांग्ला' ह्या रचना अनुक्रमे भारत आणि बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ टागोर हे जगातील एकमेव कवी आहेत.

1880 : भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म.

पांडुरंग वामन काणे हे प्रसिद्ध भारतीय धर्मशास्त्राचे अभ्यासक आणि कायदेपंडित होते. भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. बिटिश शासनाने 1942 साली  त्यांना `महामहोपाध्याय’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठांनी त्यांना डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. 1951 मध्ये `लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’ ह्या संस्थेचे त्यांना सन्माननीय फेलो करण्यात आले. संस्कृत भाषेचे एक मान्यवर विद्वान म्हणून त्यांना राष्ट्रपतींचे प्रशस्तिपत्र देण्यात आले (1958). `भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च बहुमान त्यांना 1963 मध्ये प्राप्त झाला.

1907 : मुंबईमध्ये विजेवर चालणारी पहिली ट्रॅम सुरु झाली.

1928 : ब्रिटनमध्ये महिलांसाठी मतदानाचे वय 30 वरून 21 करण्यात आले आहे.

1990 : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

1990 साली सुप्रसिद्ध भारतीय गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दादासाहेब पुरस्कार प्रदान करण्यात आला.

2002 : जेष्ठ लेखिका दुर्गाबाई भागवत यांचे मुंबई येथे निधन.

दुर्गाबाई भागवत या मराठी अस्मितेच्या आणि विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या होत्या. त्या जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक होत्या. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलीभाषेची मांडणी आढळते. भावमुद्रा (1960), पैस (1970), डूब (1975), व्यासपर्व (1962) या ललितलेखनातून त्यांची कसदार निर्मिती दिसून येते. सन 2002 साली भारतीय संस्कृत आणि बौद्ध साहित्याचे अभ्यासक, समाजवादी आणि लेखक दुर्गा नारायण भागवत उर्फ दुर्गा भागवत यांचे निधन झाले.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/kDYzUrh May 2022 Important Events : 6 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/P2TuCcU May 2022 Important Events : 5 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/Euj5HCZ Days in May : मे महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 7th May 2022 Important Events : 7 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/4pmECBc

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या