13th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 13 जून चे दिनविशेष.

1969 : विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन.

प्रल्हाद केशव अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कोडित खुर्द या गावी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला.

1967 : विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन.

विनायक पांडुरंग करमरकर ऊर्फ नानासाहेब करमरकर हे प्रसिद्ध शिल्पकार होते. मुंबईच्या ‘सर जे. जी. कला विद्यालय’ येथे ते शिल्पकला शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने करमरकरांना 1962 साली ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन गौरवले.

1940 : जालियान वाला बाग हत्याकांडाला कारणीभूत असलेले गव्हर्नर माईकल ओडवायर यांची हत्या करणारे भारतीय स्वातंत्र्यसेनानी उधमसिंग यांना लंडन मध्ये फाशी देण्यात आली.

1943 : नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीवरून टोकियो येथे पोहचले.

2000 : स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुध्द खेळतांना ग्रॅडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला, तर तीन लढती अनिर्णित राखण्यात यश मिळविले. या लढती तीन तास सुरु होत्या.

1879 : थोर भारतीय स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू आणि अभिनव भारत सोसायटीचे संस्थापक वीर स्वातंत्र्यसेनानी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर यांचा जन्मदिन.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/60W9z8b June 2022 Important Events : 7 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/Ia9VcFC Days in June : जून महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

<a href="https://ift.tt/QcXRG45 June 2022 Important Events : 10 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 13th June 2022 Important Events : 13 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/mI01GOM
0 टिप्पण्या