Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १४ जून, २०२२, जून १४, २०२२ WIB
Last Updated 2022-06-14T02:43:54Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

Pune : पुणे महापालिकेत लवकरच मेगा भरती! क्लार्क, इंजिनियर म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी Rojgar News

Advertisement
job opening

पुणे : पुण्यात (Pune) काम करायला कुणाला नाही आवडणार. यातच सराकारी नोकरी (government jobs) असली की जमलंच. पुण्यात किंवा कोणत्याही मोठ्या शहरात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण प्रयत्न करतायत. त्यासाठी त्या-त्या जागांनुसार अभ्यासही करतायत. अशातच आता पुणे महापालिकेच्या (pune municipal corporation) माध्यमातून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महपालिकेत लवकरच जागा निघण्याची शक्यता आहे. महापालिकेत लवकरच मेगा भरती होणार आहे. लिपिक, अभियंता, अग्निशमन दल, आरोग्य व्यवस्थापन विभांगांसह इतर विभागांतील पदांच्या सुमारे पाचशे जागांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात काढली जाणार आहे. अर्जसंख्यानुसार संपूर्ण राज्यात या भरतीप्रक्रियेसाठी परीक्षा केंद्रे असणार आहेत. केंद्र सरकारच्या आयपीबीएस कंपनीमार्फत भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली आहे.

भरती प्रक्रिया कुठपर्यंत आली?

महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी महापालिकेतील रिक्त पदांची भरती करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार प्रत्येक विभागाकडून रिक्त पदांची माहिती मागविली होती. याआधारे रिक्त पदांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. रोस्टर मंजुरीचे काम जवळपास पूर्ण होणार आहे. ही भरतीप्रक्रिया कशी करावी आणि परीक्षा घेण्यासाठी कोणत्या संस्थेला काम द्यावे, याविषयी चर्चा सुरू होती. ही परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस या केंद्र सरकारच्या कंपनीबरोबर करार करण्यात आलाय. महापालिकेतील लिपिक, अभियंता, अग्निशमन दलातील रिक्त पदांसह इतर पदांची भरतीप्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होईल. या पदांची जाहिरात पुढील आठवड्यात काढली जाणार आहे.

किती जागांची भरती होणार?

सुमारे 500 पदांची भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनं केली जाणार असल्याची माहिती आहे. किती शहरांत परीक्षा केंद्रे करायची, हे अर्जांच्या संख्येवर ठरणार आहे. नागपूर, औरंगाबाद, मुंबई या शहरांबरोबर इतरही शहरांत परीक्षा केंद्रे करावी लागण्याची शक्यता आहे. 500 परीक्षा केंद्रे तयार करावी लागतील, असं आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं.

कोणत्या पदांसाठी जागा?

महापालिकेतील लिपिक, अभियंता, अग्निशमन दलातील रिक्त पदांसह इतर पदांची भरतीप्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होईल. या पदांची जाहिरात पुढील आठवड्यात काढली जाणार आहे.

किती जागा निघणार?

सुमारे 500 पदांची भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनं केली जाणार असल्याची माहिती आहे. किती शहरांत परीक्षा केंद्रे करायची, हे अर्जांच्या संख्येवर ठरणार आहे.

परीक्षा केंद्रे कुठे असणार?

नागपूर, औरंगाबाद, मुंबई या शहरांबरोबर इतरही शहरांत परीक्षा केंद्रे करावी लागण्याची शक्यता आहे.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Pune : पुणे महापालिकेत लवकरच मेगा भरती! क्लार्क, इंजिनियर म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधीhttps://ift.tt/MLACOx9