19th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 19 ऑगस्ट. श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला म्हणून हा दिवस कृष्णजयंती जन्माष्टमी या नावांनी ओळखला जातो. गोपाळकाला हा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच, श्रावणात दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. जरा ही मूळची राक्षसी होती. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 19 ऑगस्ट दिनविशेष.

19 ऑगस्ट : दहीहंडी.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. हंडी फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात.

जरा-जिवंतिक पूजन :

श्रावणात दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. महाराष्ट्रात अशीच जिवतीची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. त्यासाठी आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले जाते अथवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा करावी. ह्या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळदकुंकू देऊन जेवू घालावे.

संत ज्ञानेश्वर महाराज जयंती

संत ज्ञानेश्वर हे 13 व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी आणि तत्त्वज्ञ होते. फक्त 16 वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी (भगवद्गीतेवरील भाष्य) आणि अमृतानुभव यांची रचना केली. संत ज्ञानेश्वरांनी 1296 मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

1871 : विल्बर राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राइट यांचा जन्म.

1918 : भारताचे 9वे राष्ट्रपती आणि 8वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचा जन्म.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/RUuEQTV Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

<a href="https://ift.tt/nOqj6o4 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

<a href="https://ift.tt/6aw4tmI 2022 : भारतात सर्वत्र गोपाळकालाची उत्सुकता; 'अशी' आहे परंपरा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 19th August 2022 Important Events : 19 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/zjNlCmb
0 टिप्पण्या