TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

UGC-NET Exam: यूजीसी-नेट परीक्षा पुढे ढकलली! परीक्षा सप्टेंबरमध्ये, 64 विषयांचा परीक्षेत समावेश Rojgar News

UGC NET Exam

UGC NET Exam Postponed : राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नेट) दुसरा टप्पा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. आता ही परीक्षा 20 ते 30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी सांगितले की, नेट परीक्षा यापूर्वी 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान होणार होती. यापूर्वी डिसेंबर 2021 आणि जून 2022 चा यूजीसी-नेटचा पहिला टप्पा 9, 11 आणि 12 जुलै 2022 रोजी देशभरातील 225 शहरांमध्ये असलेल्या 310 परीक्षा केंद्रांमधील 33 विषयांसाठी घेण्यात आला होता.

आता परीक्षा कधी होणार जाणून घ्या

एम. जगदीश कुमार यांनी सांगितले की, दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 12, 13 ते 14 ऑगस्ट 2022 दरम्यान होणार होती. आता युजीसी-नेट ही परीक्षा डिसेंबर 2021 ते जून 2022 (विलीनीकरण सायकल्स) शेवटच्या टप्प्यातील परीक्षा 20 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान होणार असून, त्यात 64 विषयांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना महत्त्वाचा सल्ला

परीक्षा केंद्रांचा तपशील 11 सप्टेंबर रोजी देण्यात येणार असून परीक्षेचे प्रवेशपत्र 16 सप्टेंबरपर्यंत जाहीर करण्यात येईल, असे यूजीसीच्या अध्यक्षांनी सांगितले. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जाऊ नयेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे. कोणत्याही कन्फर्म माहितीसाठी एनटीएच्या https://ugcnet.nta.nic.in वेबसाइटला भेट द्या किंवा ugcnet@nta.ac.in चौकशीसाठी ई-मेलही करू शकता, असेही ते म्हणाले. यूजीसी नेट परीक्षेत ‘हिंदू स्टडीज’ या नव्या विषयाची भर पडली आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदाची पात्रता ठरविण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. यूजीसी नेट परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते

 

 


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: UGC-NET Exam: यूजीसी-नेट परीक्षा पुढे ढकलली! परीक्षा सप्टेंबरमध्ये, 64 विषयांचा परीक्षेत समावेशhttps://ift.tt/AO5yWXB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या