Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२, सप्टेंबर ०७, २०२२ WIB
Last Updated 2022-09-07T05:43:17Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

JOBS | फक्त बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी, लेखी परीक्षेची गरज नाही Rojgar News

Advertisement
Railway Jobs

JOBS | भारतीय रेल्वेने (Indian Railway) 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी (Job Opportunity) उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी कोणत्याही परीक्षेविना (Without Exam) थेट भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया स्पोर्टस् कोट्यातून करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 5 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाली आहे. तेव्हा वाट कसली पाहता, लगेचच अर्ज करा..

इथं करा अर्ज

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तीन आठवड्यांहून अधिक दिवस मिळणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. https://www.rrc-wr.com/ या लिंक, संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करु शकता.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक अट जाहीर करण्यात आली आहे. पदवीच्या दुसऱ्या अथवा अंतिम वर्षाला असणारा, इयत्ता 12वीं उत्तीर्ण उमेदवाराला अर्ज करता येईल. या पदासाठीची निवड ही खेळातील तुमच्या प्राविण्यावर अवलंबून राहिल. तसेच तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेचाही विचार होईल.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्जदार उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असायला हवे.

अर्जासाठी शुल्क

खुला आणि ओबीसी प्रवर्ग- 500 रुपये
एससी,एसटी, महिला, आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग – 250 रुपये

वेतन किती असेल

या पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवाराला दर महिन्याला 25500-81100 / 29200- 92300 रुपये वेतन मिळेल.

या पदासाठी भरती

रेसलिंग (पुरुष) फ्रीस्टाइल – 1, शूटिंग (M/W) एअर पिस्टल / स्पोर्ट्स पिस्टल/ राइफल शूटिंग 3 पद /राइफल शूटिंग प्रोन -1 , कबड्डी – ऑलराउंडर – 01, हॉकी – 02, स्तर-2 आणि स्तर-3 – 16, वेटलिफ्टिंग 02, पावरलिफ्टिंग -1, पावर लिफ्टिंग- 1, रेसलिंग – 01, शूटिंग – 01, कबड्डी- पुरुष – 01, कबड्डी – महिला – 2 हॉकी पुरुष – 01 जिमनॅस्टिक पुरुष – 02 क्रिकेट पुरुष – 02 क्रिकेट महिला – 1

या लिंकवर थेट अर्ज पाठवा

https://ift.tt/hcWgfEd


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: JOBS | फक्त बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी, लेखी परीक्षेची गरज नाहीhttps://ift.tt/x3s5JHE