Advertisement

Newborn Baby Care Tips : हिवाळा (Winter Seaseon) हा ऋतू प्रत्येकासाठी आव्हानात्मक असला तरी मात्र, लहान मुलांसाठी हा ऋतू जास्तच धोकादायक असतो. याचं कारण म्हणजे हिवाळ्यात जिवाणू आणि विषाणू झपाट्याने वाढतात आणि नवजात बालकांना याचा सर्वाधिक धोका असतो. नवजात मुलांची प्रतिकारशक्ती प्रौढांच्या तुलनेत खूपच कमकुवत असते. त्यामुळे थोडासा जरी निष्काळजीपणा केला तरी बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. बाळाच्या शरीराची केवळ अंतर्गत काळजी घेणे आवश्यक नाही, तर बाह्य शरीरालाही थंडीपासून वाचवावे लागते.

थंडीच्या दिवसांत कोरडी हवा नवजात बालकांच्या त्वचेची आर्द्रता काढून टाकते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. हिवाळ्यात आई-वडीलांनी आपल्या नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवा

थंड वातावरणात बाळाची काळजी घेण्यासाठी आईने तिच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. आईच्या आहारात काही समस्या असल्यास त्याचा थेट परिणाम नवजात बालकावर होतो. हिवाळ्यात नवजात बालकांना हायपोथर्मियाचा सर्वाधिक धोका असतो. यामध्ये नवजात बाळाच्या शरीराचे तापमान कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत बाळाच्या शरीराचे तापमान राखण्यासाठी पालकांनी बाळाला पुरेसे कपडे घालावेत. मुलाचे पाय, हात आणि डोके झाकून ठेवा. नवजात बाळाला अशा खोलीत ठेवा ज्याचे तापमान सुमारे 25 ते 27 अंश असेल.

त्वचेची काळजी घ्या

नवजात बालकांना अंघोळ घालणे आवश्यक आहे. मात्र, जास्त थंडी असल्यास तुम्ही एक दिवसाआड त्यांना अंगोळ घालू शकता. अंघोळ करण्यासाठी, तुम्ही पाण्यात मऊ बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा द्रव पदार्थ घाला आणि मुलाचे शरीर मऊ टॉवेलने स्वच्छ करा. याबरोबरच दिवसातून 2 ते 3 वेळा मुलाचा ड्रेस बदला.

तेल मालिश गरजेची आहे

अंघोळीनंतर नवजात मुलाच्या शरीराची मालिश करणे सर्वात महत्वाचे आहे. बॉडी मसाजसाठी तुम्ही बदाम, खोबरेल तेल वापरू शकता. मात्र, केमिकलयुक्त तेल कधीही वापरू नये.

त्वचेला 2 ते 3 वेळा मॉइश्चरायझ करा

तुमच्या बाळाची त्वचा मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर वापरा. Moisturize वापरण्यापूर्वी, तुमच्या डॉक्टरांची परवानगी घ्या. मॉइस्चराइजमुळे बाळाच्या त्वचेला ओलावा मिळतो आणि कोरडेपणा दूर होतो.

उबदार कपडे घाला

बाळाला थंडीपासून वाचविण्यासाठी त्याला उबदार कपडे घालावेत. थंडीच्या दिवसांत बाळाच्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी त्यांना मऊ आणि उबदार कपडे घालणे गरजेचे आहे.

'या' गोष्टी चुकूनही करू नका

नवजात मुलाला कधीही पाठीवर झोपवू नका. कारण पाठीवर झोपवल्यास बाळाला श्वास घेण्यास अडथळा येईल.

नवजात बालकांना तापाचा धोका जास्त असतो. अशा स्थितीत बाळाचे तापमान जास्त आहे असे वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

नवजात मुलाचे लसीकरण कधीही चुकवू नका. डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेत मुलाचे लसीकरण करून घ्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/JdTEta0 : वर्टिगो हा आजार नेमका कशामुळे होतो? वाचा आजाराची लक्षणं आणि उपचार

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Winter Tips : हिवाळ्यात 'अशी' घ्या नवजात बाळाची काळजी; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणामhttps://ift.tt/O71XNWr
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Winter Tips : हिवाळ्यात 'अशी' घ्या नवजात बाळाची काळजी; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणामhttps://ift.tt/O71XNWr