Advertisement

<a href="https://ift.tt/0c5qHgw To Improve Immunity : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा उद्रेक पाहायला मिळत आहे. भारतातही कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासन अलर्टवर आहे. मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. अशा तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) घेण्याचं आवाहनही केलं जातं आहे. यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढेल. यासोबतच तुम्ही काही घरगती उपायांनी तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता.

तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवाल? (How to Improve Your Immunity)

इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आणि घरगुती उपाय येथे जाणून घ्या. हा उपाय फारच प्रभावी ठरेल. शिवाय हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अधिक पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. हा सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे सैंधव मीठ (Himalayan Salt). यालाच रॉक सॉल्ट (Rock Salt) असेही म्हणतात. पाण्यामध्ये सैंधव मीठ मिसळून प्यायल्याने तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होईल.

यासाठी काय करावे?

एक ग्लास पाण्यामध्ये पाव चमचा सैंधव मीठ (Himalayan Salt) म्हणजे रॉक सॉल्ट (Rock Salt) मिसळा. आता हे पाणी सरबताप्रमाणे हळूहळू प्या.

सैंधव मिठयुक्त पाणी सेवन करण्याचे फायदे?

सैंधव मिठामध्ये अनेक प्राकृतिक गुण आढळतात. यामुळे शरीराती तीनही दोष, वात-पित्त-कफ यांचे संतुलन राखले जाते. आयुर्वेदानुसार, वात-पित्त-कफ हे शरीराचं संतुलन राखतात. या तीन दोषांमधील असमतोल प्रत्येक रोगाचे मूळ असल्याचे मानले जाते.

सैंधन मिठाचे सेवन केल्याने पचन क्रिया सुधारते आणि चयापचय वाढते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि कोणत्याही विषाणू किंवा जीवाणूंचा शरीरावर हल्ला रोखण्यास मदत होते.

तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी तुम्हाला दररोज एक ग्लास हे पाणी प्यावे लागेल. तुमच्या शरीराला आवश्यक खनिजे मिळतील. खनिजांच्या संतुलित प्रमाणामुळे तुमची प्रतिकारशक्ती सुधारेल.

सैंधव मिठाचं पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपण तुलने कमी पाणी पितो, यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. अशावेळी सैंधव मिठयुक्त पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होते. याशिवाय, सैंधव मिठाच्या पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकले जातात.

स्नायू दुखी आणि पेटके या समस्यांपासून सुटका

शरीरात काही आवश्यक खनिजांच्या कमतरतेमुळेही स्नायू दुखी आणि पेटके या समस्या उद्भवतात. एका ग्लास पाण्यात सैंधव मीठ मिसळून प्यायल्याने तुम्हाला या त्रासापासून आराम मिळेल.

रक्तदाब सामान्य ठेवण्यास उपयुक्त

मिठाचे अतिरिक्त सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. पण सैंधव मीठ रक्तदाब सामान्य ठेवण्यास प्रभावी आहे. सैंधव मीठ पोटॅशियमने समृद्ध असते, त्यामुळे या मिठामुळे रक्तदाब वाढत नाही तर रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते. उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाबाची समस्या असलेल्या रुग्णांना सैंधव मिठाचे नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण अशावेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे गरजेच आहे, त्यानंतरच सैंधव मिठाचं सेवन करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Immunity Tips : इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय, BF.7 आणि व्हायरल आजारांपासूनही मिळेल सुटकाhttps://ift.tt/zLljvoh
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Immunity Tips : इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय, BF.7 आणि व्हायरल आजारांपासूनही मिळेल सुटकाhttps://ift.tt/zLljvoh