Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २६ डिसेंबर, २०२२, डिसेंबर २६, २०२२ WIB
Last Updated 2022-12-25T19:43:28Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

Jobs : बेरोजगारांसाठी नवीन वर्षात मोठ्या संधी! नोकरीची प्रतिक्षा संपेल, या दोन सेक्टरमध्ये होईल बंपर भरती Rojgar News

Advertisement
Job

नवी दिल्ली : नवीन वर्षांत नोकरीच्या शोधात (Job Search) असलेल्या तरुणांसाठी आनंदवार्ता आहे. नवीन वर्षांत त्यांना अनेक संधी उपलब्ध होतील. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, तरुणांना टेलिकॉम (Telecom) आणि सेवा क्षेत्रात (Service Sector) नवीन संधी उपलब्ध होतील. या क्षेत्रात बेरोजगारांची मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, त्यांना काही दिवसातच चांगल्या संधी उपलब्ध होतील. देशातील तरुणांना कौशल्य वाढविता येणार आहे. त्यांना प्रशिक्षणाची संधी मिळेल. त्यांना पदोन्नतीची संधी ही मिळेल.

जॉब पोर्टल आणि कर्मचारी उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यांच्या मते, भारतातील तरुणांना नवीन वर्षांत चांगल्या नोकऱ्या उपलब्ध असतील. येत्या वर्षात नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण संमिश्र असेल. काही दिवसांपासून तंत्रज्ञान, दूरसंचार क्षेत्र आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजागाराच्या संधी वाढल्या आहेत.

तज्ज्ञांच्या मते, पुढील वर्षातही याच क्षेत्रात महत्वपूर्ण जागा उपलब्ध होतील. या क्षेत्रात नवीन मनुष्यबळ लागेल. त्यामुळे या क्षेत्रात रोजागाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. रोजगार सेवा कंपनी टीमलीज सर्व्हिसेसने दावा केला आहे की, सेवा क्षेत्रात भारतात मार्च महिन्यापर्यंत अनेक रोजगार उपलब्ध होतील.

सोसायटी फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे मुख्य कार्य अधिकारी आचल खन्ना यांनी नोकरीच्या संधीविषयी माहिती दिली. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा तंत्रज्ञान उद्योग सुस्त आहे. या क्षेत्रात भरती प्रक्रिया 18% घटली आहे. पण हा काळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे येत्या वर्षात या क्षेत्रात नोकरी मिळविणे आव्हानात्मक नसेल. अनेक संधी उपलब्ध असतील.

टीमलीज सेवाचे मुख्य व्यापार अधिकारी मयूर ताडे यांनी जागतिक घडामोडींचा रोजागारवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले. पण तरीही देशात 77% कंपन्या रोजगार उपलब्ध करुन देतील अशी आशा त्यांना आहे.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Jobs : बेरोजगारांसाठी नवीन वर्षात मोठ्या संधी! नोकरीची प्रतिक्षा संपेल, या दोन सेक्टरमध्ये होईल बंपर भरतीhttps://ift.tt/A4c61Bb