Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२, डिसेंबर २२, २०२२ WIB
Last Updated 2022-12-22T05:48:46Z
careerLifeStyleResults

National Mathematics Day 2022: आज राष्ट्रीय गणित दिवस, जाणून घ्या कोण होते रामानुजन, का आहे खास हा दिवस?

Advertisement

National Mathematics Day 2022: भारतात दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय गणित दिवस (National Mathematics Day 2022) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना समर्पित आहे. 2012 मध्ये, केंद्र सरकारने अशी घोषणा केली होती की, दिग्गज गणितज्ञ रामानुजन यांच्या स्मरणार्थ 22 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जाईल. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये गणिताच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करणे. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणिताच्या स्पर्धा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना गणिताच्या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रवृत्त केले जाते.

राष्ट्रीय गणित दिवस कसा साजरा केला जातो?
देशात 2012 पासून दरवर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. हा दिवस गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना गणिताचे मानवतेच्या विकासातील महत्त्व याबद्दल लोकांमध्ये जागृती करणे हा आहे. भारतातील विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. युनेस्को आणि भारत यांनी गणितीय ज्ञानाचे शिक्षण आणि समज वाढविण्यासाठी एकत्र काम केले. यासोबतच विद्यार्थ्यांना गणिताचे शिक्षण देण्यासाठी आणि हे ज्ञान जगभरातील विद्यार्थी आणि शिकणाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत.

राष्ट्रीय गणित दिनाचे महत्त्व
राष्ट्रीय गणित दिनाचे महत्त्व जाणून घेणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे, हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे मानवतेच्या विकासासाठी गणिताचे महत्त्व, तसेच याबद्दल लोकांमध्ये जागृती करणे हा आहे. या दिवशी गणिताचे शिक्षक व विद्यार्थ्यांना शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाते आणि गणितासाठी अध्यापन-शैक्षणिक साहित्य आणि संबंधित क्षेत्रातील संशोधनावर सविस्तर चर्चा केली जाते.

जाणून घ्या श्रीनिवास रामानुजन यांच्याबद्दल काही खास गोष्टी

-श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तामिळनाडूमधील इरोड येथील तमिळ ब्राह्मण अय्यंगार कुटुंबात झाला. रामानुजन यांनी कुंभकोणम येथील शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेतले. मात्र त्यांना गणित शिवाय इतर विषयात रस नसल्याने ते बारावीच्या परीक्षेत नापास झाले. ज्या शाळेत ते बारावीत दोनदा नापास झाले, ती शाळा आता रामानुजन यांच्या नावावर आहे.

-रामानुजन यांनी वयाच्या 12 व्या वर्षी त्रिकोणामितीमध्ये प्रभुत्व मिळवले होते. त्यांनी अनेक प्रमेये विकसित केली. अनेक सूत्रांचा शोध लावला. त्याच्या आश्चर्याने जगभरातील गणितज्ञ आश्चर्यचकित झाले.

-1912 मध्ये त्यांनी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. येथे त्यांची गणिती प्रतिभा सर्वांनी ओळखली आणि त्यांना केंब्रिज विद्यापीठ, ट्रिनिटी कॉलेजमध्ये पाठवले.

-दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वी रामानुजन ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले.

-1916 मध्ये त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली. 1917 मध्ये लंडनच्या मॅथेमॅटिकल सोसायटीवर त्यांची निवड झाली.

-1918 मध्ये रामानुजन केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटी, रॉयल सोसायटी आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजचे फेलो म्हणून निवडले गेले. 1919 मध्ये ते भारतात परतले.

-श्रीनिवास रामानुजन यांचे 26 एप्रिल 1920 रोजी क्षयरोगामुळे (33 वर्षे) निधन झाले.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: National Mathematics Day 2022: आज राष्ट्रीय गणित दिवस, जाणून घ्या कोण होते रामानुजन, का आहे खास हा दिवस?https://ift.tt/8RkUdru