TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Railway Recruitment: रेल्वेत 12वी पाससाठी निघाली भरती,पाहा पगार आणि करा अर्ज Rojgar News

Indian Railways

मुंबई : रेल्वेत नोकरी (Railway Recruitment) करणाऱ्यासाठी इच्छूक असणाऱ्या तरुणांसाठी (candidate) एक चांगली बातमी आहे. दक्षिण रेल्वेकडून (Southern Railway) वेगवेगळी स्पोर्टसची पदं भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरती मिळेल. ज्या तरुणांना रेल्वेत नोकरी करायची आहे, ते दक्षिण रेल्वेच्या अधिकृत साईटवरती जाऊन त्यांचा अर्ज भरू शकतात. विशेष म्हणजे 2 जानेवारी ही अंतिम तारिख आहे. rrcmas.in या रेल्वेच्या अधिकृत साईटवरती जाऊन तुम्ही अर्ज दाखल करु शकता.

अशा पद्धतीने होणार भरती

VII CPC पे मॅट्रिक्सचा स्तर 4/5: 5 पोस्ट
VII CPC पे मॅट्रिक्सचा स्तर 2/3: 16 पदे

एकूण रिक्त पदांची संख्या – 21 पदे

या व्यक्ती करु शकतात अर्ज

लेव्हल 2/3 पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवी असणे अनिवार्य आहे.

4/5 च्या पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज दाखल करायचा आहे. त्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठकडची पदवी असणं आवश्यक आहे.

वरील पदांसाठी तीन डिंसेबरपासून अर्ज करणे सुरु आहे, ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी 2 जानेवारीपुर्वी अर्ज दाखल करावा. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, जम्मू काश्मीर, लाहौल, स्पिती जिल्हे आणि हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटे, अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप बेटे आणि परदेशात राहणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी आहे.

रेल्वे भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज दाखल करायचा आहे त्यासाठी ऑनलाईन शुल्क भरावे लागणार आहे. आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 250 शुल्क आहे, तर इतर उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क आहे.

जाणून घ्या पगार

लेव्हल 2: 19,900
स्तर 3: रु 21,700
स्तर 4: रु 25,500
स्तर 5: 29,200


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Railway Recruitment: रेल्वेत 12वी पाससाठी निघाली भरती,पाहा पगार आणि करा अर्जhttps://ift.tt/OU9eDxN

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या