TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Winter Health Tips : तुमच्या दिवसाची सुरुवात 'या मसालेयुक्त' पेयाने करा; अनेक समस्या होतील दूर

Winter Health Tips : उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊन करावी असे म्हणतात. कारण आरोग्य विज्ञान तज्ज्ञांच्या मते, असे केल्याने पोट साफ राहते आणि अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो. पण, हिवाळ्यात तुम्ही तांब्याच्या भांड्यातून रात्रभर ठेवलेले पाणी पिऊ शकत नाही. कारण यामुळे ते पाणीसुद्धा खूप थंड होते. आता अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की दिवसाची सुरुवात कोणत्या पाण्याने करावी? तर, सर्वात उत्तम उपाय म्हणजे तुम्ही कोमट पाणी प्या. आणि दुसरा उपाय म्हणजे ऋतूनुसार शरीराच्या गरजा लक्षात घेऊन येथे सांगितलेल्या अप्रतिम मसालेयुक्त पेयाचे सेवन करा. याचे सेवन तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

दिवसाची सुरुवात चहाऐवजी कोणत्या पेयाने करावी?

हिवाळ्यात किंवा कोणत्याही ऋतूत तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करू शकता. तसेच, तुम्ही हिवाळ्यात चहाऐवजी मसाल्याच्या पदार्थांपासून तयार केलेलं पेय पिऊ शकता. हे पेय चवीलाही चांगले आणि तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे.  हे पेय तयार करण्यासाठी साहित्य खालीलप्रमाणे...

1 ग्लास पाणी घ्या.

त्यात थोडं आलं घ्या.

अर्धा चमचा हिरवी वेलची पावडर घ्या.

अर्धा चमचा ओवा घ्या

धण्याचे दाणे घ्या.

त्यात थोडं जिरे घाला.

अशा पद्धतीने 'हे' पेय तयार करा

सगळे मसालेयुक्त पदार्थ एकत्र करून पाण्यात टाका आणि साधारण 4-5 मिनिटं ते उकळू द्या.

नंतर गॅस बंद करून पेय गाळून घ्या. आणि या पेयाचा आस्वाद घ्या.

'या' गोष्टी लक्षात घ्या

एक गोष्ट मात्र, लक्षात ठेवा की, या पेयाचे अर्ध्या कपपेक्षा जास्त सेवन करू नका. अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीराला त्रास होऊ शकतो.

तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत यानुसार प्रत्येक पदार्थाचं माप ठरवा.

दररोज सकाळी या पेयाचे सेवन करा. अर्ध्या कपापेक्षा जास्त प्यायल्याने पोटात जळजळ होऊ शकते, त्यामुळे पेयाचे प्रमाण मर्यादित ठेवा.

हे पेय प्यायल्याने तुम्हाला डोकेदुखी, जळजळ, पोटात मळमळणे, मायग्रेनचा त्रास होणे, यांसारख्या अनेक समस्यांपासून आराम मिळेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/cRm2NGT Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Winter Health Tips : तुमच्या दिवसाची सुरुवात 'या मसालेयुक्त' पेयाने करा; अनेक समस्या होतील दूरhttps://ift.tt/oGIWKhg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या