Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३, जानेवारी १३, २०२३ WIB
Last Updated 2023-01-13T01:48:25Z
careerLifeStyleResults

Cold Wave : काळजी घ्या! फुफ्फुस आणि श्वसनाचे आजारांचा धोका वाढला, हवेची गुणवत्ता ढासळली

Advertisement

Mumbai Air Pollution : देशभरात (India) एकीकडे थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबई (Mumbai), नवी मुंबईच्या (Navi Mumbai) हवेची गुणवत्ता दिल्लीच्या हवेप्रमाणे ढासळली आहे. देशात विशेषत: उत्तर भारतात थंडीची लाट आहे. उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी आहे. राजधानी दिल्लीत थंडीने अनेक विक्रम मोडले आहेत. महाराष्ट्रातही पारा कमालीचा घसरला आहे. थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हिवाळ्यात हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या खूप वाढली आहे.

दरम्यान, दिल्लीतील एलएनजेपी हॉस्पिटलचे एमडी डॉ. एस कुमार यांनी फुफ्फुस आणि श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या हिवाळ्यात खोकल्याचे रुग्ण वाढण्याचा अंदाज  आहे. हवामानाचा परिस्थिती अशीच राहिल्यास संपूर्ण जानेवारीत मुंबईकरांना खराब हवामानाचा त्रास सहन करावा लागू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

विनाकारण घराबाहेर पडणे टाळा

डॉ. एस कुमार यांनी सांगितले आहे की, 'वाढलेली थंडी आणि खराब हवेच्या गुणवत्तेमुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, उच्च रक्तदाब आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पूर्वी दिवसाला 40 ते 50 रुग्ण दाखल होत होते, पण आता ही संख्या वाढून 60 ते 70 पर्यंत वाढली आहे.' लोकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मुंबईची हवाही वाईट श्रेणीत

मुंबईची हवा अत्यंत प्रदूषित झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही शहराचे वातावरण वाईट आणि अत्यंत खराब श्रेणीत पोहोचण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हिवाळ्याच्या मोसमात शहरातील हवा अनेकदा खराब होते. तसेच हवामान बदलामुळे हवेच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असतो. गेल्या आठवड्यात खराब श्रेणीत असलेली हवेची गुणवत्ता रविवारी अत्यंत खराब श्रेणीत पोहोचली होती. रविवारी मुंबई शहराची हवेची गुणवत्ता 305 एक्यूआयसह अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आली. संपूर्ण जानेवारीत हवा खराब राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Cold Wave : काळजी घ्या! फुफ्फुस आणि श्वसनाचे आजारांचा धोका वाढला, हवेची गुणवत्ता ढासळलीhttps://ift.tt/EGHzbXw