TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Lohri 2023 : हिवाळ्यातील सुगीचा उत्सव म्हणजेच लोहरी; वाचा या दिवसाचं स्वरूप आणि महत्त्व

Lohri 2023 : लोहरी हा 2023 वर्षातला पहिला सण आहे. लोहरी हा सण कापणीच्या हंगामाची सुरूवात करतो. उत्तर भारतात, मुख्यतः पंजाब आणि हरियाणामध्ये तो पूर्ण उत्साहाने साजरा केला जातो. लोहरी सण आजच्या दिवशी शेकोटी पेटवून आणि त्याभोवती मित्र आणि नातेवाईकांसह नृत्य करून साजरा केला जातो. गव्हाचे देठ, तांदूळ, रेवरी, गूळ आणि मका लोक आगीत अर्पण करतात.

लोहरी हा पंजाब प्रांतात साजरा होणारा हिवाळ्यातील सुगीचा उत्सव आहे. उत्तर हिंदुस्थानातील शीख आणि हिंदू नागरिक हा उत्सव साजरा करतात. या उत्सवाशी संबंधित कथा आणि आख्यायिका पंजाब प्रांतात प्रचलित आहेत.

लोहरी सणाचं स्वरूप

लोहरी हा सूर्याच्या उत्तरायण संक्रमणाशी माघ महिन्यात येणारा उत्सव आहे. हिवाळा ऋतूला निरोप देणे असा या उत्सवाचा हेतू असतो. सामान्यत: मकरसंक्रांत सणाच्या आदल्या दिवशी लोहरी साजरा केला जातो. उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाणा या प्रांतात या दिवशी विशेष सुट्टी दिली जाते.

अग्नीपूजा या उत्सवातील महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. हिवाळा ऋतू असल्याने शेकोटी पेटविणे याला पारंपरिक महत्त्व मिळाले आहे. गूळ, उसाचा रस यांचा समावेश या दिवशी खाण्यात आवर्जून समावेश केला जातो. गावाच्या मध्यभागी सूर्यास्ताला संध्याकाळी शेकोटी पेटविली जाते. लोक त्यामध्ये तीळ, गूळ वाहतात. त्याभोवती बसून लोकगीते गातात आणि पारंपरिक नृत्य सादर करतात. शेतातील ताजी मक्याची कणसे भाजून खाणे हा एक विशेष कार्यक्रम असतो. शेतात आलेला लाल मुळा हा सुद्धा या दिवशी जेवणात समाविष्ट केला जातो. मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची पोळी, किंवा भाकरी ही या उत्सवाची महत्त्वाची मेजवानी असते. तीळ घालून केलेला भात या दिवशी जेवणात समाविष्ट असतो. याला त्रिचोली म्हटले जाते.

पंजाबच्या काही प्रांतात लोहारी या देवतेची स्थापना केली जाते. गायीच्या शेणापासून ही मूर्ती तयार करून तिची सजावट केली जाते.

लोहरीचं महत्त्व

सुगीच्या काळातील हाती येणा-या शेतातील पिकाचा आनंद साजरा करणे असं या सणाचं महत्त्व आहे. सूर्याचे उत्तरायण सुरू होऊन दिवस मोठा होत असल्याने सूर्याची पूजा केली जाते. या उत्सवाच्या निमित्ताने लहान मुले लोकगीते गातात. या लोकगीत गायनाच्या कार्यक्रमानंतर घरोघरी लहान मुलांना खाऊ आणि पैसे दिले जातात.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/2iX8KSb Days in January 2023 : नवीन वर्षाची सुरुवात, संक्रांत, भारताचा प्रजासत्ताक दिन; 'ही' आहे महत्त्वाच्या दिवसांची यादी

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Lohri 2023 : हिवाळ्यातील सुगीचा उत्सव म्हणजेच लोहरी; वाचा या दिवसाचं स्वरूप आणि महत्त्वhttps://ift.tt/EGHzbXw

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या