TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Alert : धोक्याची घंटा! तुमच्याकडून दररोज होतंय प्लास्टिकचं सेवन, नकळतपणे गिळताय अनेक बारीक कण, आरोग्याला गंभीर धोका

<a href="https://ift.tt/YmA4VFr Harms Human Body : जगभरात प्लास्टिकच्या (Plastic) कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्लास्टिकची विल्हेवाट लागत नसल्याने ते तसेच पडून राहते आणि  यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.  पर्यावरणासाठी हे अतिशय घातक आहे. प्लास्टिक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. तुम्हाला हे ठाऊक नसेल की, तुम्ही नकळतपणे दररोज अनेक प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांचे सेवन करत आहात. हो तुम्ही जे वाचताय ते अगदी खरं आहे. अनेक पदार्थांमधून मायक्रोप्लास्टिकचे कण तुमच्या शरीरात प्रवेश करतात. या प्लास्टिकचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

तुमच्याकडून दररोज होतंय प्लास्टिकचं सेवन

प्लास्टिकच्या अगदी लहान कणांना मायक्रोप्लास्टिक (Microplastic) असं म्हटलं जातं. मनुष्य नकळतपणे मायक्रोप्लास्टिकचे सेवन करतो. काही संशोधनात ही बाब समोर आली आहे. काही संशोधनाच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर, दर आठवड्याला सरासरी 0.1 ते 5 ग्रॅम मायक्रोप्लास्टिक्स मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारे प्रवेश करू शकतात. प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण सामान्यतः अन्न, पेय आणि श्वासाद्वारे आणि त्वचेद्वारे देखील शरीरात प्रवेश करू शकतात. तुम्ही दररोज नकळतपणे छोट्या-छोट्या प्लास्टिकच्या कणांचे सेवन करत आहात. याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल.

नकळतपणे गिळताय प्लास्टिकचे अतिसूक्ष्म

पाणी, मीठ, मासे, बिअर, साखर आणि मध या पदार्थांसोबत प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर, हे प्लास्टिकचे सूक्ष्म कण (5 मिमी पेक्षा कमी) पचन, श्वसन आणि रक्ताभिसरण प्रणालींमध्ये जातात. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मायक्रोप्लास्टिकमुळे मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. कारण त्यांच्यातील प्रदूषित पदार्थ अनेक आजारांशी निगडीत असतात.

मायक्रोप्लास्टिकमुळे हृदय आणि प्रजनन संबंधित समस्या तसेच मधुमेह, लठ्ठपणा आणि कर्करोग यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे संशोधकांनी मानवी शरीरात प्रवेश करणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सची संख्या आणि त्याचे संभाव्य परिणाम निश्चित करणे महत्वाचे आहे.

मायक्रोप्लास्टिकचे कण शरीरात कसे प्रवेश करतात?

प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण म्हणजे मायक्रोप्लास्टिकचे कण पाणी, मीठ, मासे, बिअर, साखर आणि मध यांच्यासह मानवी शरीरात प्रवेश करतात. संशोधनानुसार, प्रत्येक व्यक्ती दरवर्षी 11,845 ते 1,93,200 मायक्रोप्लास्टिक कण (7.7 ग्रॅम ते 287 ग्रॅम) गिळतो. या कणांचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे पिण्याचे पाणी, ज्यामध्ये नळाचे पाणी आणि बाटलीबंद (Packaged Drinking Water) पाणी समाविष्ट आहे.

खाद्यपदार्थ किंवा पाण्याव्यतिरिक्त मायक्रोप्लास्टिकचे कण धुळीतून मानवी शरीरात जातात. त्यामुळे आरोग्या धोका निर्माण होतो. दररोज अतिरिक्त 26 ते 130 मायक्रोप्लास्टिक कण फुफ्फुसांच्या संपर्कात येतात. बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण सर्वाधिक असते. पॅकेजिंग प्रक्रियेमुळे प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण पाणी किंवा खाद्यपदार्थांमध्ये मिसळतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/XNKt1aC Massage: दररोज पायांची मालिश करण्याचे अनेक फायदे; मेंदू आणि हृदयासाठीही लाभदायक

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Alert : धोक्याची घंटा! तुमच्याकडून दररोज होतंय प्लास्टिकचं सेवन, नकळतपणे गिळताय अनेक बारीक कण, आरोग्याला गंभीर धोकाhttps://ift.tt/iWvCLPA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या