<a href="https://ift.tt/vuHhMAl Rose Day 2023 : आज 7 फेब्रुवारीपासून वॅलेंटाईन वीकला (Valentine Week) सुरुवात झाली आहे. आज वॅलेंटाईन वीकमधील पहिला आणि खास डे आहे, तो म्हणजे 'रोज डे' (Rose Day). या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना गुलाबाचं फुल देतात. ही प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत मानली जाते. त्यांच्या आवडीनुसार, काही जण एक फुल देतात तर, काही जण संपूर्ण गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करतात. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला कोणतं गुलाब देता, यावरही अनेकांचं लक्ष असतं. दरम्यान, असंही एक गुलाब आहे, जे तुम्ही इच्छा असतानाही देऊ शकणार नाही, असं का ते वाचा.

एक असंही गुलाब आहे, ज्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे, इतकंच नाही तर हे अत्यंत दुर्मिळ प्रकारचं गुलाब आहे. याचं कारण म्हणजे हे गुलाबाचं फुल तब्बल 15 वर्षातून एकदा फुलतं. त्यामुळेच हे गुलाबाचं फुल जगातील सर्वात महागडं गुलाबाचं फुल आहे. हे गुलाबाचं फुल घेण्याआधी बहुदा अंबानी किंवा अदानी यांच्या पत्नीही एक वेळा विचार करतील. कारण या एका गुलाबाची किंमत 100 कोटींहून जास्त आहे. जाणून घ्या खास गुलाबाच्या फुलाबद्दल...

'हे' गुलाब कोणतं?

या गुलाबाचे नाव ज्युलिएट गुलाब (Juliet Rose) आहे. ज्युलिएट गुलाब अतिशय सुंदर आहे. त्याचा रंग पांढरा, गुलाबी आणि पिवळा यांचे मिश्रण आहे. यातील पाकळ्यांची रचना विशिष्ट प्रकारची असते, त्यामुळे हे फुल अतिशय भरगच्च असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गुलाब तब्बल 15 वर्षानंनंतर फुलतं. हे गुलाब फार सुवासिक असते. याचा सुगंध दूरपर्यंत दरवळतो.

'या' गुलाबाची किंमत 128 कोटी रुपये

फायनान्स ऑनलाइनच्या अहवालानुसार, ज्युलिएट गुलाबाची किंमत सुमारे 15.8 दशलक्ष डॉलर आहे म्हणजेच सुमारे 128 कोटी आहे. हे फुलण्यासाठी किमान 15 वर्षे लागतात, त्यामुळेच या गुलाबाची किंमत इतकी जास्त आहे. या गुलाबाला जर्दाळू रंगाचा संकर म्हणतात. 2006 मध्ये जेव्हा हे फूल पहिल्यांदा फुलले तेव्हा त्याची किंमत सुमारे 90 कोटी रुपये होती.

या व्यक्तीने तयार केलं ज्युलिएट गुलाब

डेव्हिड ऑस्टिन यांनी या गुलाबाचा शोध लावला होता. त्यांनी अनेक प्रकारच्या गुलाब एकत्रित करून हे संकरीत प्रजातीचं गुलाब तयार केले. डेव्हिड ऑस्टिनच्या वेबसाइटनुसार, या खास गुलाबाचा सुगंध हलका चहाच्या सुगंधासारखा आणि अत्तराच्या सुगंधासारखा आहे. डेव्हिड ऑस्टिन यांनी सांगितले की, ज्युलिएट गुलाबाची किंमत इतकी जास्त आहे कारण त्याचं झाडं वाढवण्यासाठी आणि गुलाब फुलण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

महत्त्वाच्या इतर बातम्या

<a href="https://ift.tt/8WK6VHb Week Full List 2023: यंदा रोज डे, प्रपोज डे, किस डे कधी? जाणून घ्या व्हॅलेंटाईन्स वीकबाबत सर्वकाही

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Happy Rose Day : एक गुलाब... जे 15 वर्षातून एकदा फुलतं, किंमत 100 कोटींहून अधिकhttps://ift.tt/iWvCLPA
0 टिप्पण्या