Ghee Benefits For Diabetes : मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्यामुळे सध्या जगभरात अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेहाला जर योग्य प्रकारे टाळले नाही तर हा आजार अनेकांना जीवघेणा ठरू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. तसे, असे अनेक खाद्यपदार्थ आहेत, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात. असाच एक पदार्थ म्हणजे साजूक तूप. हे तूप अनेक भारतीय पदार्थांमध्ये खास वापरले जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तूप खरोखर फायदेशीर आहे का? हे जाणून घेऊयात.

मधुमेहाच्या रुग्णांना अनेक खाद्यपदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. पण, तूप सारखे काही पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. मिळालेल्या रिपोर्टनुसार, तुपात पॅल्मेटिक ऍसिड आणि ओलेइक ऍसिड सारखे फॅटी ऍसिड असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेह असलेल्यांनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न खावे.

ग्लायसेमिक इंडेक्स कमी करतं

बटाटे, तांदूळ आणि गोड पदार्थांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. पण, या गोष्टींमध्ये तूप घातल्याने त्यांचा उच्च ग्लायसेमिक इंडेक्स कमी होऊ शकतो. तुपाचे सेवन केल्याने ग्लुकोजच्या पातळीवर अजिबात परिणाम होत नाही. त्यामुळे मधुमेहाने त्रस्त असलेले लोक कोणतीही काळजी न करता सहजपणे तूप आपल्या आहाराचा भाग बनवू शकता. तुपामुळे भरपूर चरबीयुक्त अन्न पचणे सोपे होते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. पण शुद्ध गाईच्या दुधापासून बनवलेले तूपच खावे आणि प्रक्रिया केलेले तूप टाळावे.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी तूप फायदेशीर का आहे?

1. तूप हेल्दी मानले जाते.

2. तूप हे व्हिटॅमिन के आणि इतर अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करते, ज्याची मधुमेही रुग्णांना सर्वात जास्त गरज असते.

3. उच्च कार्बोहायड्रेट अन्नामध्ये तुपाचा समावेश केल्यास ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. एवढेच नाही तर तुपामुळे रक्तातील साखरेची अचानक वाढ रोखता येते.

4. तूप आतड्याचे आरोग्य सुधारते. हे हार्मोन्सचे व्यवस्थापन करण्यास देखील मदत करते. याशिवाय ते इन्सुलिन स्राव नियंत्रित करण्याचे काम करते.

5. तुपामध्ये व्हिटॅमिन डी असते, जे कॅल्शियम शोषण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/WtFmpKd Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांसाठी साजूक तूप फायदेशीर; शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदेhttps://ift.tt/jpkYmy9
0 टिप्पण्या